प्रतिनिधी, 29 ऑक्टोबर: ठाण्यातील ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पहिल्याच दिवशी आपण पोलीस आयुक्तांना फोन करून निष्पक्षपाती तपासाच्या सूचना दिल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता निर्भयपणे तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून, मुख्य आरोपींना पकडले जात नसल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाने आजही ठाण्यात जोरदार आंदोलन केले. आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत या प्रकरणाच्या तपासाची पोलिसांकडून माहिती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे यांनी, काही बाहेरचे लोक येऊन या दुर्दैवी घटनेचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.
या प्रकरणात अत्यंत वेगाने कारवाई करत आरोपींना पकडण्यात आले असून त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. पोलिसांवर दबाव आणण्याचे किंवा जनतेला वेठीस धरण्याचे काम कोणीही करू नये. वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे जनतेला नाहक त्रास होत असून बाहेरचे लोक ठाण्यात येऊन त्रास देण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
परवा रात्री झालेली जाळपोळ, बंद केलेला महामार्ग तसेच नौपाड्यात पोलिसांवर झालेली दगडफेक आणि फेकलेल्या सोड्याच्या बाटल्या या घटनांचा संदर्भ देत, पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखावर काही लोक राजकीय पोळी भाजत असल्याचे ते म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे हे आपले काम असून नागरिकांची गैरसोय होता कामा नये. शिवसेनेकडून कायदा-सुव्यवस्थेला कुठेही बाधा येणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाशी वारंवार नाव जोडले जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याच्या भावनेतून शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडीच्या संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा आपल्याकडे पाठवला असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. पूर्णेकर यांची हत्या दुःखद असून त्यावरून इतर राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, हे अधिक दुर्दैवी असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आरोपानंतर मीनाक्षी शिंदे यांचा तडकाफडकी राजीनामा
- दिसेल तिथं ठोकणार! ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रुपाली पाटील यांचा सुशील कुलकर्णींना भर चौकात बदडण्याचा इशारा
- ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीचा हात असण्याची शक्यता; रामदास आठवले यांचा गंभीर आरोप
Quick Answers
एकनाथ शिंदे यांनी हत्येनंतर पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांना फोन करून निष्पक्षपाती तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता निर्भयपणे तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून, मुख्य आरोपींना पकडले जात नसल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाने ठाण्यात जोरदार आंदोलन केले.
शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणात अत्यंत वेगाने कारवाई करून आरोपींना पकडण्यात आले असून त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणाशी वारंवार नाव जोडले जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याच्या भावनेतून शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडीच्या संघटक पदाचा राजीनामा दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








