प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा हल्लाबोल, जरांगेंवरही गंभीर आरोप

रामदास कदम यांनी मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांना लक्ष्य करत ऑडिओ क्लिप भाजपचीच असल्याचा दावा केला, यावर लाड यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

Published On: 

Ramdas Kadam and Prasad Lad dispute over Manoj Jarange audio clip

मुंबई, 23 ऑक्टोबर: शिवसेना नेते रामदास कदम यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांनी दाखवलेली ऑडिओ क्लिप ‘एआय’ची नसून ती थेट भाजपाचीच क्लिप असल्याचा खळबळजनक दावा कदम यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी जरांगे आणि प्रसाद लाड एकत्र जेवण करत असल्याचे तसेच स्वागत करत असल्याचे फोटो दाखवत, त्यांच्यातील जिवाभावाच्या मैत्रीवर निशाणा साधला.

मराठा समाजाने न्याय मिळवण्यासाठी जरांगे यांना डोक्यावर घेतले, मात्र ते आता सर्वांची फसवणूक करत आहेत, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली. स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी ते आरोप करत असून आता उघडे पडले आहेत, असे ते म्हणाले. प्रसाद लाड आणि जरांगे यांच्यात तब्बल ३२ मिनिटे चर्चा झाल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी कदम यांनी एक औषधाची बाटली दाखवत, ‘हे औषध ओळखता का?’ आणि ‘तुमच्याकडे ही क्लिप कधी आली?’, असे थेट सवाल जरांगेंना केला.

मराठा समाजासाठी रात्रंदिवस धावणाऱ्या एका मावळ्यानेच ही क्लिप आणून दिली असून, पुराव्याशिवाय आपण बोलत नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. यात भाजप नेते प्रवीण दरेकर यांचेही नाव समोर आले असून या क्लिपची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी आपण नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्याचे सांगत, जरांगेंनी हे पाप पुन्हा केल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला.

गृहराज्यमंत्रिपद घरात असल्याने सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांचेही कदम यांनी खंडन केले. मुलाला मंत्रिपद मिळाल्यापासून त्याच्या जिवावर उठण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. आपण स्वतः पोलीस खाते चालवले असून या प्रकरणाची चौकशी होऊ द्या, आरोप करणाऱ्यांच्याच हे अंगाशी आले असून ते एकमेकांची नावे घेत असल्याचे कदम यांनी नमूद केले.

रामदास कदम यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. कदम हे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांनी संजय राऊतांसारखे कृत्य करू नये, असा टोला लाड यांनी लगावला. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम कदम यांनी करू नये. रामदास कदम यांनीच एकनाथ शिंदे यांना संपवण्याची सुपारी घेतली आहे की काय, असा प्रश्न आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडत असल्याचे लाड म्हणाले.

एकनाथ शिंदे हे केवळ शिवसेनेचे नव्हे, तर संपूर्ण महायुतीचे नेते असल्याचे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. आपण आणि उदय सामंत हे सरकारच्या माध्यमातून जरांगे यांच्याशी सातत्याने चर्चा करत होतो. जरांगे पाटील यांनी ‘प्रसाद लाड आता कुठे गेले, ते भेटत नाहीत’, असा उल्लेख केला होता. मात्र, त्यांचे हे आरोप आपण मान्य करणार नाही. आपण केवळ सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाचे काम करत होतो, दररोज त्यांना भेटणे आपले काम नाही, असेही लाड यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

जरांगे यांनी दाखवलेली ऑडिओ क्लिप 'एआय'ची नसून ती थेट भाजपाचीच क्लिप असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही