प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारस्कर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘जरांगे हे सुपारीबाज असून गर्दी दाखवून कंत्राटे मिळवणे हाच त्यांचा धंदा आहे,’ असा घणाघात बारस्कर यांनी केला. पहिले बारामतीची सुपारी घेतली, मग राजेश टोपे आणि पवार साहेबांनी काय दिले, असा सवाल करत बारस्कर यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला. दुसऱ्याची आणि नंतर तिसऱ्याची सुपारी घेण्याचे काम सुरू असून, मराठा समाजाला विकून मोठे होऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.
जरांगेंना ५०० ते ९०० कोटींची कंत्राटे मॅनेज करून दिल्याचा खळबळजनक दावा बारस्कर यांनी केला. एकाच माणसाला कंत्राट मिळेल अशी व्यवस्था केली गेली. पाटोद्याचे उपोषण सोडताना बंद खोलीत विखे, पलांडे आणि जरांगे काय करत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आधी विखे पाटलांनी वाटोळे केले म्हणायचे, आदल्या दिवशी शिव्या द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी माफ करायचे, असे बारस्कर म्हणाले. तसेच, जलसंपदा खात्याचे कंत्राट जरांगेंच्या जवळ असलेल्या ‘गलांड्या’ या व्यक्तीला दिल्याचे पुरावे आपण दिले असल्याचेही बारस्कर यांनी सांगितले. आंदोलनातून कंत्राटे चालतात आणि आपण हे चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना २१ वर्षांचा पुतण्या आणि इतर नातेवाईकांनी करोडो रुपयांच्या जमिनी कशा घेतल्या, असा प्रश्न बारस्कर यांनी विचारला. ‘जरांगेंची लाभार्थी टोळी आहे. त्यांच्या जवळ असणाऱ्या धनंजय दुफाके याच्या बहिणीने २३ लाख रुपये एकरप्रमाणे ५ हेक्टर जमीन घेतली आहे. दुफाकेच्या नातेवाईकांच्या नावावर जमिनी जातात, हे पैसे कुठून येतात याचे उत्तर द्या,’ असे आव्हान त्यांनी दिले. जे काही कमावले आहे, ते जिरवण्यासाठीच हे सर्व सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मराठ्यांच्या पोरांचे ते भांडवल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठा समाज १०० टक्के आरक्षणात गेला असे सांगत जरांगेंनी मोर्चे आणि उपोषण बंद केले. मात्र, नंतर आरक्षण नाही असा ‘फेक नॅरेटिव्ह’ त्यांनीच पसरवला, ज्यामुळे मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या, असा थेट आरोप बारस्कर यांनी केला. ‘तू ३५० लोक मारली, आता आरक्षणाचा मुद्दा संपला आहे, त्या ३५० गोरगरीबांना पैसे वाट,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. नोंदी असेल तो ओबीसी आणि नसेल तो एसईबीसी हेच आधीही चालले होते, मग सर्व मराठे ओबीसीमध्ये गेले तर एसईबीसीच्या १० टक्के आरक्षणाचे काय करायचे, असा मुद्दा उपस्थित करत, जरांगेंनी केवळ आपली उरलेली इज्जत वाचवण्यासाठी आणि गर्दी जमवण्यासाठी अनेक आमदारांचे पाय धरल्याचे ते म्हणाले.
जरांगे केवळ लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून विषप्रयोगाचा, तसेच शंभूराज देसाई आल्यावर १०० कोटी खाल्ल्याचा सनसनाटी आरोप करतात, असे बारस्कर म्हणाले. ५०० कोटी नावावर घेतले तर आधी तोंड का उचकवले नाही, तसेच भाजप नेत्याने शिंदेंना आणि शिंदेंनी जरांगेंना पैसे दिले हा दावा हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. नगरच्या मंत्र्यांसोबतची कुजबुज आणि पुरावे देण्याचे आव्हान त्यांनी दिले. दोन वर्षांपूर्वी मंत्र्यांचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे सांगून ब्लॅकमेल का केले, असा सवाल करत, ‘ओ ब्लॅकमेलर तू समाजाला फसवले आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
‘नागात जसे विष असते तसे याच्यात विष आहे,’ असे म्हणत एकनाथ शिंदेंचे कौतुक करत होता की नाही हे जरांगेंनी सांगावे अशी मागणी त्यांनी केली. काल जरांगे रडले नाहीत आणि त्यांनी शिव्या दिल्या नाहीत, या दोन चांगल्या गोष्टी केल्याचा टोला लगावत, हे कायद्याचे आणि संविधानाचे राज्य असून जरांगेंचा हा भंपकपणा असल्याचे बारस्कर म्हणाले. २०२९ ला पाडण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंनी कुणाला आणणार ते सांगावे आणि उद्या फक्त व्हिडिओ लावावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही तारीख देत नाही, थेट ऑपरेशन करतो’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
- झोपेतून उठल्यावर हात सुन्न का होतात? जाणून घ्या यामागची कारणे आणि धोके
- मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा
Quick Answers
जरांगे हे सुपारीबाज असून गर्दी दाखवून कंत्राटे मिळवणे हाच त्यांचा धंदा असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. तसेच, जरांगेंना ५०० ते ९०० कोटींची कंत्राटे मॅनेज करून दिल्याचे बारस्कर यांनी म्हटले आहे.
जलसंपदा खात्याचे कंत्राट जरांगेंच्या जवळ असलेल्या 'गलांड्या' या व्यक्तीला दिल्याबाबतचे पुरावे आपण दिले असल्याचे अजय बारस्कर यांनी सांगितले.
दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना २१ वर्षांचा पुतण्या आणि नातेवाईकांनी करोडो रुपयांच्या जमिनी कशा घेतल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच जरांगेंच्या जवळ असणाऱ्या धनंजय दुफाके याच्या बहिणीने २३ लाख रुपये एकरप्रमाणे ५ हेक्टर जमीन घेतली असून हे पैसे कुठून येतात याचे उत्तर द्या, असे आव्हान त्यांनी दिले.
जरांगेंनी आधी मराठा समाज १०० टक्के आरक्षणात गेला असे सांगितले, पण नंतर आरक्षण नाही असा 'फेक नॅरेटिव्ह' पसरवल्यामुळेच मराठा तरुणांनी आत्महत्या केल्याचा थेट आरोप बारस्कर यांनी केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








