कोल्हापूर, 18 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ३५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीत महायुतीची 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' आणि महाविकास आघाडीची 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' यांच्यात थेट लढत होत आहे.
यंदाच्या निवडणुकीत २५ जागांसाठी तब्बल ५० उमेदवार निवडणूक रिंगणात असून, एकूण ५ हजार ४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उमेदवारांनी मतदान उरकून घेण्यावर भर दिला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गगनबावडा येथील मतदान केंद्रावर, तर त्यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही आघाड्यांकडून मतदार आणि ठरावधारकांना एकत्रितपणे मतदान केंद्रांवर आणले जात असून, सहलीवर गेलेले मतदारही मतदानासाठी केंद्रांवर येत आहेत.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ३५ ही मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतपत्रिकेचा फोटो काढून तो व्हायरल केल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी दिला आहे. करवीर तालुक्यातील मतदान स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये पार पडत असून, सर्वच केंद्रांवर निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.
दरम्यान, गोकुळसाठी महायुतीकडून दुसऱ्या दिवशीही ठरावधारकांना शपथा देण्याचे सत्र सुरूच आहे. बाळूमामा मंदिर परिसरात शपथ देऊन मगच या ठरावधारकांना मतदानासाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे या निवडणुकीत विजयाचा गुलाल उद्या कोण उधळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांच्या खर्चात कपातीच्या सूचना
- गोकुळ दूध संघासाठी आज ३५ केंद्रांवर मतदान; ५० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
- शायना एनसी यांच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरे, सलमान खानची खास उपस्थिती
Quick Answers
या निवडणुकीत २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत.
महायुतीची 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' आणि महाविकास आघाडीची 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' यांच्यात थेट लढत होत आहे.
मतपत्रिकेचा फोटो काढून तो व्हायरल केल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी दिला आहे.
या निवडणुकीची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये पूर्ण होईल.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






