दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांच्या खर्चात कपातीच्या सूचना

दुष्काळी परिस्थिती आणि तिजोरीवरील ताण पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना खर्चात २० टक्के कपातीचे आणि काटकसरीचे निर्देश दिले आहेत.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: राज्यात यंदा एल निनोच्या प्रभावामुळे अपेक्षित पाऊस न झाल्याने कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना निधी खर्चात २० टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेऊन रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या हातातील पीक वाळून गेले असून त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. २०२७ मध्येही अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, उपलब्ध निधीचा वापर प्रामुख्याने जलसंधारण, पाणी आणि चारा योजनांसाठी करण्यावर भर देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दुष्काळामुळे खर्चकपातीच्या हालचालींना वेग आला असला तरी, शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती आणि 'लाडकी बहीण' यांसारख्या योजनांच्या निधीत कोणतीही कपात न करण्याची स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जागतिक अस्थिरता, आर्थिक मंदी आणि दुष्काळी संकटाच्या काळात काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी विभागप्रमुखांना केले असून, सचिवांना सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेण्यास सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहीर केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असल्याने राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असतानाच, लाडक्या बहिणींसाठी इतर योजनांचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही सातत्याने होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही