कोल्हापूर, 18 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk Union Election 2026) २५ संचालक पदांसाठी आज, रविवारी मतदान पार पडत आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ३५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही मतदान प्रक्रिया चालेल. या निवडणुकीत ५० उमेदवार नशीब आजमावत असून महायुतीची ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ आणि महाविकास आघाडीची ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ यांच्यात थेट लढत होत आहे.
अंतिम मतदार यादीत ५,४२३ मतदारांची नोंद होती. मात्र, ५ संस्थांनी आपल्या प्रतिनिधींचे नाव न दिल्याने ५,४१८ मतदारच प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रचाराच्या काळात सहलीवर पाठवलेल्या मतदारांना शनिवारी सायंकाळी त्यांच्या तालुक्यांमध्ये परत आणण्यात आले. या मतदारांना मतदान कसे करावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले असून आज सकाळी ९ वाजता त्यांना मतदान केंद्रांवर आणले जाणार आहे.
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून सुरक्षेची कडक काळजी घेतली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास सक्त मनाई केली आहे. मतपत्रिकेचा फोटो काढल्यास किंवा तो व्हायरल केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा त्यांनी दिला आहे. शनिवारी दुपारी १२ इस्कॉर्टच्या कडक बंदोबस्तात मतदान साहित्य सर्व संबंधित केंद्रांवर रवाना करण्यात आले.
करवीर तालुक्याची मतदान प्रक्रिया स्वामी विवेकानंद कॉलेजच्या परिसरातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये पार पडत आहे. आजच्या मतदानानंतर उद्या, सोमवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. सर्वसाधारण गटाच्या मतमोजणीला जास्त वेळ लागण्याची शक्यता असल्याने, सुरुवातीला राखीव गटांचे निकाल हाती येतील. त्यामुळे सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पहिला निकाल जाहीर होऊन गुलाल उधळला जाण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शायना एनसी यांच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरे, सलमान खानची खास उपस्थिती
- कोल्हापूर: बहुचर्चित ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान; उद्या लागणार निकाल
- बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार; वडेट्टीवार, ठाकूर आणि सपकाळांचा घणाघात
Quick Answers
गोकुळ दूध संघाच्या २५ संचालक पदांसाठी मतदान होत असून यात ५० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
अंतिम मतदार यादीत ५,४२३ मतदारांची नोंद होती, मात्र ५ संस्थांनी प्रतिनिधींचे नाव न दिल्याने प्रत्यक्ष ५,४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास सक्त मनाई केली असून, मतपत्रिकेचा फोटो काढल्यास किंवा तो व्हायरल केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये सुरू होईल.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






