मुंबई, 18 ऑक्टोबर: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच मुंबईत पार पडला. या समारंभाचे काही खास फोटो आता समोर आले असून, ते सध्या व्हायरल होत आहेत.
मुंबईतील नेपियन सी रोड येथील 'शांती बंगला' या निवासस्थानी हा साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ पूर्ण झाला.
या सोहळ्याला अनेक राजकीय नेते आणि कलाकारांनी हजेरी लावली. राज ठाकरे यांनी आपल्या पत्नीसह या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पोहोचून शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, या समारंभाला अभिनेता सलमान खान यानेही उपस्थिती दर्शवली. तो आपल्या खास लूकमध्ये या ठिकाणी पोहोचला होता, ज्याचे फोटो आता पुढे आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोल्हापूर: बहुचर्चित ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान; उद्या लागणार निकाल
- बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार; वडेट्टीवार, ठाकूर आणि सपकाळांचा घणाघात
- CJP Protest: अभिजीत दिपकेंची सशर्त सुटका, मग आशुतोष रांका आणि सौरव दास कोठडीत का?
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








