प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: दसरा मेळावा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाण्याची चिन्हे आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंत्र्यांना बाजूला सारून तरुण आणि सक्रिय चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू झाली आहे.
राज्यात सत्ता स्थापन होऊन अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षित पातळीवर न झाल्याने एकनाथ शिंदे त्यांच्या कामकाजावर नाराज असल्याचे समजते. याच कारणामुळे मंत्रिमंडळातील या अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी पक्षातील तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.
या संभाव्य फेरबदलांमध्ये केवळ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार नाही, तर काही विद्यमान राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती मिळण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांच्या मते, दसऱ्यानंतर 'भाकरी फिरवण्याची' तयारी एकनाथ शिंदे यांनी केली असून, याद्वारे शिंदे सेनेतील अंतर्गत राजकीय समीकरणे नव्याने जुळवली जाणार आहेत.
आगामी राजकीय आव्हानांचा सामना करणे आणि पक्षात एकजूट टिकवून ठेवणे, ही या बदलांमागची प्रमुख रणनीती असल्याचे सांगितले जाते. हिवाळी अधिवेशन जवळ आले असल्याने प्रशासकीय कामांना गती देणे आणि नव्या पिढीला नेतृत्वाची संधी देऊन पक्ष अधिक सक्रिय करणे, असे मुख्य उद्दिष्ट असल्याचे राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे.
सध्या या मोठ्या फेरबदलांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा सुरू असून, दसऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये नेमके काय आणि कोणते बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बीसीसीआयच्या निवड समितीच्या मुलाखतीत रोहित शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्या भविष्यावर प्रश्नांची सरबत्ती
- लातूर जिल्हा बँक निवडणूक: सहकारमंत्र्यांची काँग्रेससोबत हातमिळवणी; महायुतीत वाढला तणाव
- न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुभमन गिल स्वखर्चाने नेणार वैयक्तिक नेट गोलंदाज; रणजी करंडकातही खेळणार
Quick Answers
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, अकार्यक्षम मंत्र्यांना बाजूला सारून तरुण आणि सक्रिय चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची चिन्हे आहेत. तसेच काही विद्यमान राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती मिळण्याचीही चर्चा आहे.
राज्यात सत्ता स्थापन होऊन अडीच वर्षे झाली असली तरी या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षित पातळीवर न झाल्याने एकनाथ शिंदे त्यांच्या कामकाजावर नाराज असल्याचे समजते.
आगामी राजकीय आव्हानांचा सामना करणे आणि पक्षात एकजूट टिकवून ठेवणे ही या बदलांमागची प्रमुख रणनीती असल्याचे सांगितले जाते. तसेच प्रशासकीय कामांना गती देणे आणि नव्या पिढीला संधी देऊन पक्ष अधिक सक्रिय करणे हे उद्दिष्ट असल्याचे विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे.
सध्या या मोठ्या फेरबदलांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही; तरीही राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






