लातूर जिल्हा बँक निवडणूक: सहकारमंत्र्यांची काँग्रेससोबत हातमिळवणी; महायुतीत वाढला तणाव

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली असून महायुतीत तणाव वाढला आहे.

Published On: 

MHD LOGO

लातूर, 17 ऑक्टोबर: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या निवडणुकीसाठी थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

महायुतीत असताना काँग्रेससोबत केलेली आघाडी मान्य नसल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेतृत्वाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बाबासाहेब पाटील यांच्या निर्णयाबाबत आपली नापसंती नोंदवली आहे. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि इतर भाजप नेत्यांनीही मंत्री पाटील हे महायुतीविरोधात काम करत असल्याचा थेट आरोप केला आहे.

शुक्रवारी मंत्री बाबासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी एकाच गाडीतून प्रवास करत लातूरचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचे चुलत बंधू अविनाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, तिथे समर्थक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रही दाखल करण्यात आले. दोन्ही नेत्यांच्या या एकत्र प्रवासाची राज्यभरात मोठी चर्चा झाली.

या राजकीय आघाडीवर स्पष्टीकरण देताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रित लढत आहोत. त्यामुळे विविध स्तरांतील विकासाच्या मुद्द्यावर आताही ही निवडणूक एकत्र लढत आहोत. दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनीही काल या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, मंत्री पाटील यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा असून, एक गट काँग्रेससोबत तर दुसरा गट महायुतीला पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे.

सुरुवातीला ही निवडणूक महायुती विरुद्ध काँग्रेस अशी होईल असे वाटत होते. मात्र, अचानक झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे आता लातूर जिल्हा बँकेची निवडणूक दोन पॅनलमध्ये लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नाराजीनंतर आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही