पुणे, 15 ऑक्टोबर: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे विभागातील घरांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल घेत म्हाडाने अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली असून, आता इच्छुकांना २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
पुणे मंडळातर्फे सध्या ४ हजार ४६२ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, यापूर्वी १५ ऑक्टोबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अर्ज करताना सर्वसामान्यांना अनेक तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने मुदतवाढीचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
म्हाडाच्या या घरांसाठी आतापर्यंत १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या या ऑनलाईन अर्जांमुळे महाआयटीकडे ३ हजार ८०० पेक्षा जास्त अधिवास प्रमाणपत्रे आणि ९ हजारांहून अधिक उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. याच कारणामुळे प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी आपले अर्ज दाखल करून या लॉटरी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अर्ज प्रक्रियेतील ताण कमी होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून याचे स्वागत केले जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “आमचं अफेअर होतं, तिनं मला सोडलं अन्…” करिश्मा कपूरबद्दल सलमान खानचं गंमतीशीर वक्तव्य
- राज्यात उकाड्यासह पावसाचीही शक्यता; IMD कडून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज जारी
- भिवंडीत पक्षादेश झुगारणारे समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक बडतर्फ; भाजपला केली होती मदत
Quick Answers
पुणे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून आता २२ ऑक्टोबर करण्यात आली आहे.
पुणे मंडळातर्फे सध्या ४ हजार ४६२ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना नागरिकांना तांत्रिक अडचणी येत होत्या. तसेच, लाखोंच्या संख्येने आलेल्या अर्जांमुळे महाआयटीकडे ३ हजार ८०० पेक्षा जास्त अधिवास प्रमाणपत्रे आणि ९ हजारांहून अधिक उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
या घरांसाठी आतापर्यंत १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








