राज्यात उकाड्यासह पावसाचीही शक्यता; IMD कडून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात एका बाजूला ऑक्टोबर हीटचा चटका वाढत असतानाच, हवामान विभागाने पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसासाठी पोषक स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: सध्या राज्यातून पाऊस गायब झाला असून नागरिक 'ऑक्टोबर हीट'च्या चटक्यांनी त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी ही उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे म्हटले आहे.

या अंदाजानुसार, १५ ऑक्टोबर रोजी सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. या भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे १६ ऑक्टोबरला हवामानाची संमिश्र स्थिती पाहायला मिळेल; एकीकडे ठाण्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे पुणे, सोलापूर, धाराशिव, सांगली आणि कोल्हापूरमध्ये ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

त्यानंतर १७ ऑक्टोबरला राज्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण पाहायला मिळेल.

१८ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसासाठी अधिक पोषक स्थिती राहील. या दिवशी गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी अंदाज वर्तवताना राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे म्हटले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही