भार्गवी चिरमुलेंचं ६ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘मराठी मिडियम’मध्ये साकारणार नकारात्मक भूमिका

भार्गवी चिरमुले स्टार प्रवाहवरील ‘मराठी मिडियम’ मालिकेतून तब्बल सहा वर्षांनंतर पुनरागमन करत आहेत. या मालिकेत त्या विशाखा शुक्रे ही नकारात्मक भूमिका साकारणार आहेत.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले तब्बल सहा वर्षांच्या विश्रांतीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या 'मराठी मिडियम' या नव्या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेत त्या खलनायिकेच्या म्हणजेच एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत.

या मालिकेत भार्गवी 'विशाखा शुक्रे' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. विशाखा ही एका बड्या व्यावसायिक कुटुंबातील महिला असून ती स्वतःच्या मतांवर अत्यंत ठाम असते. तिचा नवरा स्वभावाने चांगला असला तरी कर्तृत्वात कमी पडतो, याची जाणीव तिला पूर्वीच झालेली असते. त्यामुळे आपला मुलगा वडिलांसारखा होऊ नये म्हणून तिने त्याच्या संगोपनात कोणतीही तडजोड केलेली नाही.

विशाखाला प्रत्येक गोष्ट अगदी अचूक आणि परिपूर्ण लागते. तिला अस्वच्छता अजिबात चालत नाही आणि ब्रँडेड नसलेल्या गोष्टींची तिला प्रचंड चीड आहे. 'जे जे परदेशी, ते ते चांगलं' अशी तिची ठाम धारणा असल्यामुळे जुन्या चालीरीती व परंपरांना ती फारसे महत्त्व देत नाही. तसेच, टेबल मॅनर्स आणि शिष्टाचारांबद्दल ती अत्यंत आग्रही असते.

आपल्या या कमबॅकबदल बोलताना भार्गवी चिरमुले म्हणाल्या, "स्टार प्रवाहसोबत सहा वर्षांनंतर पुन्हा जोडलं जाणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. वाहिनीने कायमच वेगवेगळे विषय हाताळले आहेत. 'मराठी मिडियम'ची कथा आणि विशाखा शुक्रे हे पात्र माझ्यासाठी अगदीच वेगळं आहे. मी आतापर्यंत फारशा निगेटिव्ह भूमिका केलेल्या नाहीत, त्यामुळे हे पात्र साकारताना कस लागतोय. विशाखाचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना माझा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळेल."

'मराठी मिडियम' ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. दरम्यान, या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा पवार साकारत आहे. शालेय जीवनापासूनच एकांकिका आणि नाट्यस्पर्धांमधून अभिनयाची छाप पाडणाऱ्या श्रद्धाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

भार्गवी चिरमुले तब्बल सहा वर्षांच्या विश्रांतीनंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मराठी मिडियम' या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही