प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. गुरुवारी रात्री डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर नानांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर चाहते त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असून, यात 'प्रसाद'च्या आठवणीची विशेष चर्चा होत आहे.
नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम अत्यंत मोलाचे आहे. मकरंद अनासपुरे यांच्या साथीने त्यांनी 'नाम' संस्थेची सुरुवात केली होती. या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक गरजूंना मदत करत असत. या संस्थेचे कामकाज अनेकदा आपला मुलगा मल्हार अगदी चोखपणे पाहत असे, असे नानांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.
सध्या नानांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांचा भाचा प्रसाद याचा उल्लेख केला आहे. प्रसादविषयी सांगताना ते म्हणतात, "हा तर अगदी सावली सारखाच असतो जसं, काय खायचं नाही? आणि खायचं? सगळं हाच ठरवतो."
याच व्हिडीओमध्ये पुढे बोलताना नानांनी मल्हारची एक आठवण सांगितली आहे. "आम्ही छान मच्छी बनवली होती, मी म्हणालो बोलव मल्हार कुठे आहे… तेव्हा कळलं की तो संस्थेच्या कामासाठी निघालाय… माझी झोपमोड होऊ नये यासाठी मुलगा स्वतःच कामासाठी निघाला…" असे नाना म्हणाले. या व्हायरल व्हिडीओतून नाना पाटेकरांनी मुलगा मल्हार आणि भाचा प्रसाद या दोघांचेही तोंडभरून कौतुक केल्याचे दिसून येत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- माणुसकीला काळिमा! डिझेलसाठी पैसे नसल्याने बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवले, हतबल बापाने खांद्यावरून गाठले रुग्णालय
- बुसान चित्रपट महोत्सवात सिक्कीमच्या त्रिवेणी गिता रायचा डंका; पटकावले दोन मोठे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी FDA मध्ये १० कोटींचा ‘सुपारी’ घोटाळा; फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







