भुसावळ, 11 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये पैशांच्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Bhusawal Crime) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूषण वावळे असे या मृत तरुणाचे नाव आहे. हत्येचा प्रकार लपवण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह महामार्गालगतच्या फूटपाथवर फेकून दिला होता.
महामार्गाजवळ मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. हा अपघात असावा असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, मृतदेहाची पाहणी आणि शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला. भुसावळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या आधारे पोलिसांनी संजय दत्तू आवटे आणि प्रमोद लाहोरिया या दोन संशयितांना तातडीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या हत्याकांडातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. एका २१ वर्षांच्या तरुणाचा अशाप्रकारे अंत झाल्याने भुसावळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या हत्येमागे पैशांच्या वादाव्यतिरिक्त आणखी काही कारण आहे का, याचा सखोल तपास भुसावळ पोलीस करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? ड्रॉवरमध्ये ठेवा ‘हे’ ७ पौष्टिक स्नॅक्स
- पुढच्या निवडणुकीत कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा विक्रम पाचपुतेंना अजितदादा स्टाईल इशारा
- चेहऱ्यावरील व्हाइटहेड्स काढण्यासाठी ३ सोपे घरगुती उपाय; त्वचा होईल मऊ आणि चमकदार
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









