Share

‘दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीतही रेल्वे बंद झाली नव्हती’; अभिजित दिपकेंचा संताप

सीजेपीला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी नाकारल्याने अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला असून, आणीबाणीतही रेल्वे बंद झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

Published On: 

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

दिल्ली, 11 ऑक्टोबर: सीजेपीला (CJP) दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. “दिल्ली ही नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? सगळ्या मेट्रो आणि रेल्वे बंद करून टाकल्या, रस्ते ब्लॉक केले. आणीबाणीच्या काळातही रेल्वे बंद झाल्या नव्हत्या. किती लोकांना डिटेन करणार? मलाही अटक करा,” असे आव्हान दिपके यांनी दिले आहे. तसेच सौरभ दास आणि आशुतोष रांका यासाठी तयार असल्याचेही ते म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांनी १३ कोटी मते हटवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावर बोलताना दिपके म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांनी मते हटवण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती का? सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म ६ मधील बदलाला मंजुरीही दिली नव्हती. मग त्यांनी कोणालाही न विचारता इतकी मोठी कारवाई केली, तर त्यांच्या विरोधात कलम १९ नुसार मिळालेल्या घटनात्मक अधिकाराखाली आंदोलन करण्यासाठी आम्हाला परवानगीची काय गरज आहे? जंतरमंतर हे आंदोलनासाठीच निश्चित केलेले ठिकाण असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

या सरकारला आंदोलनाची प्रचंड भीती वाटत असून मोदी आणि अमित शाह यांनी आपला रक्तदाब तपासून घ्यावा, असा टोला दिपके यांनी लगावला. ज्ञानेश कुमार सरकारसाठी इतके महत्त्वाचे का आहेत, असा सवाल करत त्यांनी “राजाचा जीव पोपटात अडकला आहे आणि ज्ञानेश कुमार तोच पोपट आहे. त्याला पकडले तर राजाही जाईल,” अशी खोचक टीका केली.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच पार्टी’तर्फे १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे. यापूर्वी २ ऑक्टोबरला दिपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत इशारा दिला होता की, राजीनामा न दिल्यास देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत धडकतील आणि पोलिसांनी जिथे अडवले तिथेच जंतरमंतर उभारले जाईल. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट नाकेबंदी करण्यात आली असून ५७ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. तसेच अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून पोलिसांनी १० छावण्या उभारल्या आहेत आणि सीजेपी कार्यकर्त्यांची देशभरात धरपकड सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही