प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र दुःख व्यक्त केले जात असताना, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना रोखठोकपणे मांडल्या आहेत. तनुश्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
एकेकाळी तनुश्रीने (Tanushree Dutta) नाना पाटेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते, जे त्यांनी फेटाळून लावले होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा लाईव्ह येत तिने संताप व्यक्त केला. ती म्हणाली की, “माझ्याबद्दल नकारात्मकतेची लाट पसरवली जात आहे. लोक इतके मूर्ख कसे असू शकतात? एखाद्या व्यक्तीबद्दल प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण मला आलेला अनुभव मला माहीत आहे. मला जुने मुद्दे पुन्हा काढायचे नव्हते, त्यामुळे मी काही काळानंतर प्रतिक्रिया देण्याचे ठरवले होते.”
मृत्यूमुळे केलेल्या चुका माफ होत नाहीत, याकडे लक्ष वेधत तनुश्री म्हणाली, “एखाद्या व्यक्तीचे निधन झाले म्हणून त्याने आयुष्यात केलेले कांड विसरले जात नाहीत किंवा बहिष्कार टाळला जात नाही. त्याने ज्यांना त्रास दिला, त्यांचे खातं बंद होत नाही. लोक मला माफ करायला सांगत आहेत, पण देवही पश्चात्ताप आणि माफीशिवाय कोणाला माफ करत नाही. सर्वांत आधी गुन्ह्याची कबुली देऊन, आपण कोणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त केले आहे हे मान्य करावे लागते.”
‘मी टू’ मोहिमेनंतर आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल बोलताना तिने सांगितले की, एका टोळीने तिचे जगणे कठीण केले होते. “जी मुलगी आठवड्यातून ५ वेळा वर्कआऊट करायची, जगभर बिनधास्त फिरायची, तिच्यासोबत करिअरच्या शिखरावर असताना असं काही घडलं नाही. पण नंतर माझ्या गाडीचे ब्रेक्स कापले गेले. मी पूर्णपणे थकले होते. रोज काली मंदिरात जाऊन रडत या लोकांना माझ्या आयुष्यातून दूर करण्याची मी प्रार्थना करायची,” असे तनुश्रीने या व्हिडीओमध्ये नमूद केले.
नाना पाटेकर यांच्यासोबत काम करताना आपण केवळ २४ वर्षांचे होतो, हे सांगताना तिने मनात सतत भीती असल्याचे म्हटले. “त्यानंतर मला सेटवर जाण्याची इच्छाच होत नव्हती. तो केवळ सैतान नाही, तर महासैतान होता. मला त्रास देण्यात त्याला मजा यायची आणि आता त्याचे निधन हा माझ्यासाठी काली मातेचा चमत्कार आहे. जे लोक आज त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत, त्यांनी एकदा त्यांना भेटायला हवे होते, म्हणजे सत्य समजले असते,” अशा कठोर शब्दांत तनुश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’मुळे धोंदलगाव टँकरमुक्त; गावकऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा
- बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित राडा; दोन गटात तुफान हाणामारी, लोखंडी रॉडने फोडली डोकी
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








