बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित राडा; दोन गटात तुफान हाणामारी, लोखंडी रॉडने फोडली डोकी

माजलगावमध्ये कौटुंबिक वादातून दोन गटात हिंसक हाणामारी झाली आहे. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांच्या वापराने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

बीड, 11 ऑक्टोबर: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता माजलगाव शहरात दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रक्तरंजित राड्यात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून, दोन्ही बाजूंचे अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

माजलगाव शहरातील चांदणी ग्राउंड परिसरात नूर आणि शेख या दोन कुटुंबीयांमध्ये जुना कौटुंबिक वाद होता. शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. यावेळी काठ्या, धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यात आले. यात अनेकांची डोकी फुटली असून शरीराला गंभीर मार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले आहेत.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या सर्व लोकांना तातडीने माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना पुढील उपचारांसाठी बीड आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. याप्रकरणी सध्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि विलास घुले यांच्या हाय प्रोफाईल हत्याकांडांच्या घटना अजून ताज्या आहेत. त्यातच आता माजलगावमध्ये हा नवा रक्तरंजित राडा झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही