चेन्नई, 11 ऑक्टोबर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. चेन्नई येथील आयलँड ग्राऊंडवर आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी (Rahul Gandhi) मोदींना ‘मोगॅम्बो’ म्हणत त्यांनी देशातील लोकशाही आणि तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. मोदी सध्या स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असून गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा खेळ आता संपुष्टात आला आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
दक्षिण भारतात पहिल्यांदाच पार पडलेल्या या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यापूर्वी त्यांनी कोटा, डेहराडून, प्रयागराज, पुणे आणि इंदूरमध्ये असा संवाद साधला होता. केंद्र सरकार तामिळनाडूवर जबरदस्तीने हिंदी लादत असून येथील संस्कृती, भाषा आणि इतिहासावर हल्ला केला जात असल्याचे ते म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांची मते चोरली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. प्रश्न विचारणे ही विद्यार्थ्यांची मुख्य जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी तरुणांना न घाबरता आपल्या विश्वासावर ठाम राहण्याचे आवाहन केले.
देशभरातील आणि विशेषतः दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धीर देताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. भारतीय लोकशाहीचा विध्वंस करणाऱ्या आणि निवडणुकांमध्ये फेरफार करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांचा वापर करणाऱ्या नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत आणि अजित डोवाल यांच्यासह सर्व कटकारस्थान करणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणले जाईल. जगातील कोणतीही ताकद मोदींना कायद्याला सामोरे जाण्यापासून वाचवू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पंतप्रधान मोदींना सध्या तडजोडी कराव्या लागत असल्याचे ते म्हणाले. देशातील जनतेचा मूड आता बदलला आहे. दिल्लीत सध्या इंटरनेट बंद आहे, संपूर्ण शहर बंद असून पोलीस आणि भाजपचे गुंड रस्त्यावर मुलांना मारहाण करत असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी देशातील जिज्ञासू वृत्ती नष्ट करत असून निवडणुका आणि मते चोरत आहेत. देशाचे जे नुकसान झाले आहे, त्याची किंमत पंतप्रधान असोत वा गृहमंत्री, सर्वांना चुकवावीच लागेल, असा ठाम विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
- …म्हणून तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी नाना पाटेकरांना थेट कारगिल युद्धात पाठवले; थरारक किस्सा
- पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दिपकेंचा मानसिक छळ? सीजेपीच्या आरोपाने खळबळ
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









