दिल्ली, 10 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने (CJP Protest) दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले. मात्र, दीपके यांना अटक होताच त्यांचा एक पूर्वनियोजित व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि सीजेपीच्या ‘प्लॅन बी’ने पोलिसांना मोठा धक्का दिला.
आपल्याला पोलीस केव्हाही ताब्यात घेऊ शकतात, याची शक्यता गृहीत धरून सीजेपीने आधीच पर्यायी रणनीती आखली होती. आपल्याला अटक झाली तरीही आंदोलन सुरूच राहिले पाहिजे, या उद्देशाने दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व कोण करेल, याची माहिती देणारा व्हिडीओ आधीच रेकॉर्ड करून ठेवला होता. या व्हिडीओतून दिलेल्या सूचनेनुसार, आता सीजेपीचे अजिंक्य शिंदे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. सर्वांनी अजिंक्य शिंदे यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन दीपके यांनी केले आहे. दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनाची हवा निघून जाईल, हा पोलिसांचा अंदाज या पूर्वतयारीमुळे फोल ठरला.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून शेकडो लोक दिल्लीत दाखल होत असल्याने शहराला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यूट्यूबर ध्रुव राठी, तसेच सीजेपीचे आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सीजेपीने आपल्या अधिकृत खात्यावरून आंदोलकांना जंतर-मंतरकडे पोहोचण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही सर्वांना जंतर-मंतरकडे कूच करण्याचे आवाहन करतो! दिल्ली पोलिसांनी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केल्यास, ते तुम्हाला जिथे अडवतील तेच तुमचे जंतर-मंतर बनेल.” या आंदोलनाला आता विरोधकांकडूनही पाठिंबा मिळत असून, कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- CJP चे दिल्लीतील आंदोलन चिघळले; दगडफेकीत दोन पोलीस जखमी, केजरीवाल आणि ममता बॅनर्जींसह १००० जण ताब्यात
- आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनात राहायचं? दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेसमोर पर्याय
- करमाळ्यात दुष्काळसदृश स्थितीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मांडली व्यथा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









