Share

महाराष्ट्रावर ‘तिहेरी’ संकट! पुढील २४ तास धोक्याचे, हवामान खात्याचा अलर्ट जारी

हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी केला असून पुढील २४ तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. राज्यात तिहेरी संकट येण्याची शक्यता आहे.

Published On: 

Dark clouds and bright sun symbolizing mixed weather conditions in Maharashtra

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी नवा अलर्ट जारी केला असून, पुढील २४ तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. या अंदाजानुसार राज्यावर आता तेहरी संकट येणार आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली असली, तरी नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा जोरदार चटका सहन करावा लागत आहे. असे असले तरी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने (IMD Alert) स्पष्ट केले आहे.

१० ऑक्टोबरच्या हवामान अंदाजानुसार, कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येथे ‘यलो अलर्ट’ दिला आहे. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोडणाऱ्या कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये १० ऑक्टोबर रोजी हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोल्हापूर शहर आणि घाटमाथा परिसरात, तसेच साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. सांगली जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला असून, सोलापूर जिल्ह्यात मात्र हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसह नाशिकच्या घाटमाथ्यावरही १० ऑक्टोबरला कोरडे हवामान राहील. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा कोणताही अंदाज नसून तेथेही हवामान कोरडेच राहील. नाशिकचे तापमान २० ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने मराठवाड्यासाठी कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. छत्रपती संभाजीनगरमधील तापमान २१ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते.

विदर्भासाठी हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये १० ऑक्टोबरला हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. अमरावती जिल्ह्यात तापमान २२ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून, सध्या अमरावतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येथे 'यलो अलर्ट' दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही