प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: एखादी व्यक्ती जग सोडून गेली, म्हणजे तिने केलेल्या चुका किंवा गुन्हे आपोआप माफ होतात का? #MeToo मोहिमेअंतर्गत दिवंगत अभिनेते नाना पाटेकर (Nana Petekar) यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताला (Tanushree Dutta) आता याच मुद्द्यावरून एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भक्कम साथ मिळाली आहे.
नानांच्या निधनानंतरही तनुश्रीने आपले आरोप कायम ठेवल्याने तिच्यावर चौफेर टीका होत होती. पण आता या वादात अभिनेत्री संध्या मृदुल हिने उडी घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर करत संध्याने तनुश्रीला जाहीर पाठिंबा दिला आहे.
कोणाच्या मृत्यूनंतर त्यांनी दुऱ्यांचं केलेलं नुकसान विसरता येत नाही, असं तिने थेट म्हटलं आहे. व्यक्तीच्या निधनानंतर लोक श्रद्धांजली वाहत असले, तरी त्या व्यक्तीवरील आरोप खोटे ठरत नाहीत, अशी रोखठोक भूमिका तिने मांडली.
Tanushree Dutta MeToo
आपल्या पोस्टमध्ये संध्या पुढे म्हणते, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं कौतुक होतं, तेव्हा पीडितेला कोणीच लक्षात ठेवत नाही. “अत्याचार करणाऱ्याने शेवटचा श्वास घेतला, तरी अत्याचाराचं सत्य खोटं ठरत नाही. त्यांच्याकडून झालेलं नुकसान कधीच संपत नाही,” असं तिने अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. पीडित व्यक्तीला कायम त्या वाईट अनुभवांसोबत जगावं लागतं, त्यामुळे आपण कायम तिच्या पाठीशी उभं असल्याचं तिने नमूद केलं.
विशेष म्हणजे, या संपूर्ण पोस्टमध्ये संध्याने कुठेही थेट नाना पाटेकर यांचं नाव घेतलेलं नाही. तरीही तिने आवर्जून वापरलेला #METOO हॅशटॅग आणि तनुश्रीच्या वक्तव्यानंतर लगेचच आलेली तिची ही प्रतिक्रिया, यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढे आणि शाळकरी मुलाचा संवाद: ‘शाळेतला वडापाव पुन्हा सुरू करा’, मुलाच्या प्रश्नावर मुंढेंचं भन्नाट उत्तर
- आधार कार्डच्या गैरवापराला बसेल आळा; घरबसल्या ‘असा’ करा तुमचा आधार क्रमांक लॉक
- गृहकर्जातून लवकर मुक्ती मिळवायचीय? EMI आणि पैशांच्या बचतीसाठी वापरा या सोप्या ट्रिक्स
Quick Answers
तनुश्री दत्ताला अभिनेत्री संध्या मृदुल हिने सोशल मीडियावर सूचक पोस्ट शेअर करत जाहीर पाठिंबा दिला आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतरही तनुश्रीने आपले आरोप कायम ठेवल्याने तिच्यावर चौफेर टीका होत होती.
संध्या मृदुल यांनी स्पष्ट केले की, अत्याचार करणाऱ्याने शेवटचा श्वास घेतला तरी अत्याचाराचे सत्य खोटे ठरत नाही आणि त्यांच्याकडून झालेले नुकसान कधीच संपत नाही. व्यक्तीच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली तरी त्यावरील आरोप खोटे ठरत नाहीत, अशी रोखठोक भूमिका तिने घेतली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








