प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: पेपरफुटीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना, “आमदार फुटले, खासदार फुटले, पक्ष फुटला, पण जेव्हा आमचा पेपर फुटला तेव्हा आभाळ फाटल्यासारखं वाटलं,” अशी उद्विग्नता राज ठाकरेंसमोर मांडली.
पेपरफुटी आणि प्रशासकीय गलथान कारभाराविरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात सहभागी होत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. तसेच, त्यांच्या या संघर्षाचे त्यांनी कौतुक केले. एमपीएससी परीक्षेतून ५०० गुणांचा ‘मराठी साहित्य’ हा वैकल्पिक विषय वगळल्याने जो अन्याय झाला आहे, त्याबाबत विद्यार्थ्यांनी ठाकरेंना सविस्तर माहिती दिली.
याशिवाय ड्रग इन्स्पेक्टर, ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे कसे मोठे नुकसान झाले आहे, याचा पाढाही आंदोलकांनी वाचला. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी कर्ज काढलेले असते, मात्र पेपरफुटीमुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याची संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आंदोलनस्थळी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मराठी तरुणांना जाती-धर्माच्या राजकारणात न अडकण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत असून वाढत चाललेले खाजगीकरण आणि खाजगी क्षेत्रात आरक्षणाची सोय नसल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्रातील नोकऱ्या केवळ मराठी तरुणांनाच मिळाव्यात, या आपल्या गेल्या २५ वर्षांपासूनच्या मागणीचा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची वादग्रस्त प्रतिक्रिया; ‘इव्हिल डेड’ शब्दावरून नेटकऱ्यांचा संताप
- ९० हजारांचा पगार आणि ५ लक्झरी गाड्या! हायकोर्टाने सचिन वाझेंना घेरले, प्रशासनालाही फटकारले
- पांढऱ्या केसांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक हेअर डाय; जाणून घ्या साहित्य आणि कृती
Quick Answers
राज ठाकरे यांनी पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला.
एमपीएससी परीक्षेतून ५०० गुणांचा 'मराठी साहित्य' हा वैकल्पिक विषय वगळल्याने अन्याय झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांना दिली. तसेच ड्रग इन्स्पेक्टर, ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मराठी तरुणांना जाती-धर्माच्या राजकारणात न अडकण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील नोकऱ्या केवळ मराठी तरुणांनाच मिळाव्यात, या आपल्या गेल्या २५ वर्षांपासूनच्या मागणीचा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








