Share

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची वादग्रस्त प्रतिक्रिया; ‘इव्हिल डेड’ शब्दावरून नेटकऱ्यांचा संताप

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने एका व्हिडिओत ‘इव्हिल डेड’ असा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Published On: 

Tanushree Dutta reaction video on Nana Patekar death

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रवासात असताना या घटनेबद्दल समजल्याचे सांगत तनुश्रीने विमानतळावरून एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने कोणाचेही नाव न घेता कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला, मात्र मृत व्यक्तीचा उल्लेख तिने ‘इव्हिल डेड’ (evil dead) असा केल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

तनुश्रीने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, तिने नाना पाटेकर यांच्या निधनावरच ही प्रतिक्रिया दिल्याचे सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे. तिच्या ‘इव्हिल डेड’ या शब्दप्रयोगावर जोरदार टीका होत आहे. नुकतेच निधन झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल अशी अपमानास्पद भाषा वापरल्याने तनुश्रीला लाज वाटली पाहिजे, असे ट्विट करत एका युजरने आपला संताप व्यक्त केला.

गुरुवारी नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॉक्टरांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रुग्णालयात मृत अवस्थेतच आणण्यात आले होते आणि ४५ मिनिटे ते एक तास सीपीआर देऊनही त्यांना वाचवता आले नाही.

अनेक वर्षांपूर्वी तनुश्री दत्ताने ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी अयोग्य वर्तन करत आपला छळ केल्याचा आरोप केला होता. २०१८ मध्ये ‘#MeToo’ चळवळीच्या दरम्यान एका मुलाखतीत तिने या घटनेवर पुन्हा भाष्य केले होते. नाना पाटेकर यांनी ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘सलाम बॉम्बे!’, ‘परिंदा’, ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, आणि ‘अपहरण’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

तनुश्री दत्ताने एका व्हिडिओमध्ये कोणाचेही नाव न घेता शोक व्यक्त करताना मृत व्यक्तीचा उल्लेख ‘इव्हिल डेड’ असा केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही