बंगळूरु, 8 ऑक्टोबर: बंगळूरु येथील फ्रीडम पार्कमध्ये एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके करणार असून, यामध्ये ध्रुव राठी (Dhruv Rathee) देखील सहभागी होणार आहे.
अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ध्रुव राठीच्या उपस्थितीची घोषणा केली. त्यांनी जास्तीत जास्त लोकांना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओत प्रकाश राज यांनी ‘सिंघम’ चित्रपटातील डायलॉग वापरून ज्ञानेश कुमारांना आव्हान दिले. एसआयआर प्रक्रिया हा केवळ मतदानाचा प्रश्न नसून, तो लोकशाही आणि संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे, असे मत प्रकाश राज यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात ओइशी घोष, नेहा बोरा यांच्यासह विविध युवा संघटना, नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि कर्नाटकातील एसआयआर प्रक्रियेमुळे प्रभावित झालेले नागरिक उपस्थित राहतील, असे प्रकाश राज यांनी सांगितले. तसेच, स्वतः प्रकाश राज, विविध संघटनांचे सदस्य आणि स्थानिक रहिवासी ८ ऑक्टोबरच्या या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक; राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी पुन्हा घेतले ताब्यात
- ५ हजार कोटींचा दावा ठोका; नवनाथ बन यांचे शिवराज मोरे यांना आव्हान, ड्रग्जप्रकरणी चौकशीची मागणी
- ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांवर पोलिसांचा बळप्रयोग; काँग्रेसकडून ८ ऑक्टोबर रोजी ‘काळा दिवस’ची घोषणा
Quick Answers
बंगळूरु येथील फ्रीडम पार्कमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके करणार असून, यामध्ये ध्रुव राठी देखील सहभागी होणार आहेत.
प्रकाश राज यांच्या मते एसआयआर प्रक्रिया हा केवळ मतदानाचा प्रश्न नसून, तो लोकशाही आणि संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे.
आंदोलनात ओइशी घोष, नेहा बोरा यांच्यासह विविध युवा संघटना, नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि कर्नाटकातील एसआयआर प्रक्रियेमुळे प्रभावित झालेले नागरिक उपस्थित राहतील.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









