Share

पुणे पदवीधरच्या जागेवरून राष्ट्रवादीत जुंपली; सुनील तटकरेंवर रुपाली ठोंबरेंचे गंभीर आरोप

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादीत वाद उफाळला असून, रुपाली पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.

Published On: 

NCP leader Rupali Patil criticizes Sunil Tatkare over Pune Padvidhar seat

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: महायुतीच्या जागावाटपात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारी पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा यावेळी त्यांना मिळवता आली नाही. वाटाघाटीनंतर ही जागा भाजपकडे गेली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खंत व्यक्त करत, पुण्याची जागा मिळवता न येणे हे आपले सामूहिक अपयश असल्याची कबुली दिली. मात्र, तटकरे यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Thombare) यांनी जोरदार टीका केली आहे. जागा न मिळणे हे सामूहिक अपयश नसून, ते सुनील तटकरे यांचे वैयक्तिक अपयश असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महायुतीच्या चर्चेमध्ये सुनील तटकरे यांच्या अपयशामुळेच भाजपने जागा स्वतःकडे घेतल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला. अजित पवार विधान परिषदेसाठी कोणालाही उमेदवारी पुन्हा देणार नसताना, सुनील तटकरे यांनी त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे याच्यासाठी विधान परिषदेची आमदारकी मिळवली, असा आरोप त्यांनी केला. तसेच, सुनील तटकरे यांनी मुलाच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पालकमंत्रीपदाचे बलिदान दिले, असा दावाही रुपाली पाटील यांनी केला आहे.

सुनील तटकरे यांनी स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याचे यश स्वतःकडे घेतले, परंतु पक्षाच्या इतर अपयशाचे खापर ते सुनेत्रा पवार यांच्यावर फोडू शकत नाहीत, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या विचारांवर आणि पावलावर पाऊल ठेवून काम करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे तटकरे यांनी आपल्या अपयशाला सामूहिक अपयश म्हणत सुनेत्रा पवार यांना त्यात विनाकारण भागीदार केल्याबद्दल रुपाली पाटील यांनी त्यांना चुकीचे ठरवले आहे.

दरम्यान, आता पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून स्मिता जाधव या निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे, पक्षात अनेक वर्षे काम करणारे भैय्या माने यांनी बंडखोरी करत या पदवीधर मतदारसंघातून आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. या घडामोडींसोबतच, पुणे शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी महायुतीत असल्यामुळे शिवसेनेनेही या जागेची मागणी केली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा मिळवता न येणे हे आपले सामूहिक अपयश असल्याची कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली होती.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही