चोपडज, 7 ऑक्टोबर: पुणे जिल्ह्यातील चोपडज (चोपडा) गावात शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कार्याचा आणि बारामतीच्या विकासातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. आपला राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, मात्र दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणूनच आपण ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज लोकांना व्यक्तिगत लक्ष देणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. अजितदादांनी स्वतःला लोकांच्या प्रश्नांसाठी झोकून दिले, मात्र तरीही त्यांच्या कामाची किंमत केली जात नसल्याची खंत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. रानात घरे बांधायची आणि तिथे वीज आली नाही म्हणून ‘दादांनी काही केले नाही’ अशी त्यांच्या नावाने बोंब मारणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. बारामतीत पाणी कोणामुळे आले, याचाही विचार लोकांनी करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान ग्रामस्थ आणि शेतकरी सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर विविध स्थानिक प्रश्न मांडले. या प्रश्नांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. इथून पुढे काय करायचे याची जबाबदारी आपली असून, दादांसारखीच मीही कायम तुमच्यासाठी उभी राहीन, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- EVM ला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा आसाममध्ये बॅलेट पेपरवरही पराभव; ४२ पैकी केवळ २ जागांवर विजय
- शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: ‘अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचाच’, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद
- भाजप नेत्याच्या नातवाकडून मुलीला मारहाण? नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरेंचा पलटवार
Quick Answers
आपला राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, मात्र दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणूनच आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
अजितदादांनी स्वतःला लोकांच्या प्रश्नांसाठी झोकून दिले, मात्र तरीही त्यांच्या कामाची किंमत केली जात नसल्याची खंत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मांडलेल्या स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच दादांसारखीच मीही कायम तुमच्यासाठी उभी राहीन, असा विश्वास त्यांनी दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









