नागपूर, 5 ऑक्टोबर: राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा करताच नागपूर पदवीधर मतदारसंघात पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. भाजपने नागपूर पदवीधरमधून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर, पक्षाचे नेते अनिल सोले यांनी उद्या दुपारी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात भाजपने पुणे पदवीधरमधून डॉ. स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेसने नागपूर पदवीधरमधून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अनिल सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आणि नागपूरचे माजी महापौर म्हणून ओळखले जातात. मागील पदवीधर निवडणुकीतही भाजपने त्यांना ऐनवेळी डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. यंदाही तिकीट न मिळाल्याने, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सोले यांनी स्पष्ट केले आहे.
२०२० च्या पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा पराभव केला होता. आता २०२६ च्या या निवडणुकीत काँग्रेसचे वंजारी विरुद्ध भाजपचे कोहळे अशी लढत होणार असली तरी, अनिल सोले आपला अर्ज कायम ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या विधानपरिषद निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असून ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं आता सामान्य बाब; आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचं वक्तव्य
- विधान परिषद निवडणूक: पुण्यात महायुतीत बंडखोरीची शक्यता; सतेज पाटील भाचीविरोधातच मैदानात
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवड्यात रवानगी
Quick Answers
भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे.
यंदाच्या निवडणुकीत पक्षाने तिकीट न दिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे अनिल सोले यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसने नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली आहे.
या निवडणुकीसाठी मतदान २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडेल आणि मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








