प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: आजच्या काळात लग्नाआधी शारीरिक संबंध असणे ही सामान्य बाब झाली आहे, असे स्पष्ट मत निर्मात्या आणि आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव (Kiran Rao) यांनी व्यक्त केले आहे. ‘लस्ट स्टोरीज ३’ च्या प्रमोशनदरम्यान एका विशेष मुलाखतीत त्यांनी आजच्या तरुण पिढीच्या नातेसंबंधांवर आणि स्वातंत्र्यावर भाष्य केले.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत किरण राव यांनी दोन पिढ्यांमधील अंतरावर प्रकाश टाकला. आजच्या तरुणाईच्या वागण्याला ‘frivolous’ म्हणण्याऐवजी ‘मुक्त’ म्हणण्याला आपण प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, आधीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या तरुणांमध्ये स्वातंत्र्याची भावना अधिक प्रबळ असून स्वतःला व्यक्त करण्याचे अनेक वेगळे मार्ग त्यांनी शोधले आहेत.
Aamir Khan Ex Wife Kiran Rao Statement
जुन्या काळातील अपेक्षांबद्दल बोलताना राव म्हणाल्या की, त्यांच्या काळात नातेसंबंधांकडून एका विशिष्ट साच्याची अपेक्षा केली जायची. एकतर केवळ शारीरिक संबंध किंवा ठरवून केलेल्या लग्नानंतरच निर्माण होणारे भावनिक नाते, असे त्याचे स्वरूप असायचे. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
सध्याच्या काळात लग्नाआधी शारीरिक संबंध आणि त्यातून निर्माण होणारी भावनिक जवळीक ही समाजाची वास्तविकता बनली आहे. याच बदललेल्या जगाला डोळ्यांसमोर ठेवून आपण कथेची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही बंधनात नसलेले दोन तरुण जेव्हा एकमेकांकडे आकर्षित होतात आणि काही विशिष्ट निर्णय घेतात, तेव्हा घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी या कथेतून मांडल्याचे किरण राव यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद निवडणूक: पुण्यात महायुतीत बंडखोरीची शक्यता; सतेज पाटील भाचीविरोधातच मैदानात
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवड्यात रवानगी
- ग्रामसभेत तरुणाला मारहाण प्रकरण: गुन्हा दाखल होताच माजी सरपंच सुनील पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी








