ग्रामसभेत तरुणाला मारहाण प्रकरण: गुन्हा दाखल होताच माजी सरपंच सुनील पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

जारगाव ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी सरपंच सुनील पाटील यांनी अनावधानाने घटना घडल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली.

Published On: 

Gram sabha dispute Pachora former Sarpanch Sunil Patil apologizes

प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामसभेत एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंच सुनील पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.

या घटनेनंतर संबंधित तरुणाने पाचोरा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माजी सरपंच सुनील पाटील यांच्यासह अन्य दोन जणांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटील यांनी स्वतःची बाजू मांडत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले.

आपण या ग्रामसभेला केवळ एक नागरिक म्हणून उपस्थित होतो, असे पाटील यांनी स्पष्ट केले. संबंधित व्यक्तीने एका बखर प्लॉटमध्ये सांडपाणी सोडले होते. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर आपण १ तारखेला ग्रामपंचायतीत तक्रार दाखल केली होती, असेही पाटील यांनी सांगितले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनील पाटील यांनी आपली बाजू मांडली. “मी त्याला या संदर्भात जाब विचारल्यानंतर तो मला अरेरावीची उत्तरे देत होता. त्या तरुणाला माझ्यासोबत विनाकारण भांडण करायचे होते. त्याने मुद्दामून अरेरावी केली व माझ्या अंगावर आला. माझा हेतू नसताना माझ्याकडून जे अनावधानाने घडले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे सुनील पाटील यांनी म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही