Share

‘काही अडचण असेल तर खुशाल जळा’, गोविंदासोबतच्या कथित अफेअरवर कोमल राणीने सोडले मौन

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी यांच्या कथित अफेअरच्या चर्चांवर आता कोमलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टीकाकारांना तसेच काही अभिनेत्रींना सडेतोड उत्तर दिले आहे.

Published On: 

Govinda Komal Rani Affair

प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: अभिनेता गोविंदा (Govinda) आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित अफेअरच्या चर्चा सध्या सिनेसृष्टीत रंगल्या आहेत. या सर्व प्रकरणावर आता कोमल राणीने आपले मौन सोडले असून, २ ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत टीकाकारांना सुनावले आहे. या पोस्टमध्ये तिने कोणाचेही थेट नाव घेतलेले नाही.

गोविंदा आणि कोमल आगामी ‘रुपा’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहण्यात आले, ज्यावरून अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. यावर स्पष्टीकरण देताना कोमलने म्हटले आहे की, दोघांना एकत्र स्पॉट करणे हा कामाचाच एक भाग आहे.

Govinda Komal Rani Affair

‘आपल्या हिरोसोबत गणपती बाप्पांचे दर्शन घेणे आणि सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करणे, हे कधीपासून चुकीचे वाटू लागले?’ असा सवाल तिने उपस्थित केला आहे. हे कोणत्याही रोमँटिक अफेअरचे प्रमोशन नसल्याचेही तिने स्पष्ट केले.

आपले खासगी आयुष्य सार्वजनिक तमाशा का बनवले जात आहे, असा प्रश्न विचारत कोमलने संताप व्यक्त केला. ती म्हणाली, ‘आम्ही एकत्र दिसलो, म्हणजे आम्ही आपलं वैयक्तिक आयुष्य मांडत आहोत किंवा चित्रपटाचा प्रचार करत आहोत, हे ठरवण्याचा अधिकार लोकांना नाही.’ टीकाकारांना थेट उत्तर देताना तिने स्पष्ट केले की, ती गोविंदासोबत काम करत असून भविष्यातही त्यांना एकत्र पाहिले जाईल. ‘जर कुणाला यावरून अडचण असेल तर, तुम्हाला जळायचं तर जळू शकता,’ अशा कडक शब्दांत तिने सुनावले.

गेल्या काही महिन्यांपासून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा गंभीर आरोप करत आहेत आणि दिव्या खोसला, कश्मीरा शाह यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, कोमलने आपल्या पोस्टमधून सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्यांचे करिअर आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, त्या अभिनेत्री इतरांच्या वादात हस्तक्षेप करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला तिने लगावला आहे. तसेच अशा व्यक्तींनी आपल्या मर्यादेत राहावे, असा इशाराही तिने दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

कोमल राणीनुसार, दोघांना एकत्र पाहिले जाणे हा कामाचाच एक भाग असून हे कोणत्याही रोमँटिक अफेअरचे प्रमोशन नाही.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही