नवी मुंबई, 4 ऑक्टोबर: केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीतील मोठ्या पक्षांकडे सत्तेत वाटा आणि विधान परिषदेच्या किमान एका जागेची मागणी केली आहे. २०१४ पासून भाजपसोबत असतानाही विधान परिषदेची एकही जागा मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणल्यानंतर २०१२ मध्ये आम्ही महायुतीमध्ये सामील झालो, अशी आठवण आठवले यांनी सांगितली. महायुतीमधील सर्व पक्षांनी आमच्या पक्षाला न्याय द्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्यासोबत असताना आम्हाला विधान परिषदेच्या सात जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीत असूनही आम्हाला एकही जागा देण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेतही पक्षाला जागा दिल्या जात नसल्याचे आठवले म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केवळ मित्रपक्षांवर अवलंबून राहू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्यावर अन्याय होत नसला तरी, सत्तेतील मोठ्या पक्षांनी सत्तेत योग्य वाटा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला पक्ष आपण स्थापन करू शकलो नाही, अशी कबुलीही आठवले यांनी दिली. सर्व रिपब्लिकन गट, संपूर्ण समाज आणि सर्वधर्मीय लोक एकत्र आले असते तर पक्षाची ताकद वाढली असती, मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेली आंदोलने चुकीची असल्याचे सांगत, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. मात्र, मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आयोगाने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, अभिजित दीपके हा अरविंद केजरीवाल यांचा माणूस असून त्याने आम आदमी पक्षात प्रवेश करावा, असा सल्ला आठवले यांनी दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दीपके यांनी आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरू नये, अशी ताकीदही त्यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मी त्यांच्यासमोर एकदम शांत असते…’; पूजा बिरारीने सांगितला सासू सुचित्रा बांदेकरांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा
- मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
- चंद्रशेखर बावनकुळेंनी बांधावर बसून शेतकऱ्यांसोबत केले जेवण, जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
Quick Answers
रामदास आठवले यांनी महायुतीतील मोठ्या पक्षांकडे सत्तेत योग्य वाटा आणि विधान परिषदेच्या किमान एका जागेची मागणी केली आहे.
शरद पवार यांच्यासोबत असताना पक्षाला विधान परिषदेच्या सात जागा देण्यात आल्या होत्या, तर महायुतीत अनेक वर्षे असूनही एकही जागा मिळालेली नाही, असे आठवले यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेली आंदोलने चुकीची असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
अभिजित दीपके यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करावा असा सल्ला आठवले यांनी दिला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरू नये अशी ताकीदही दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









