प्रतिनिधी, 2 ऑक्टोबर: ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) हिने कोल्हापूर दौऱ्यादरम्यान बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याच्या वक्तव्यावरून झालेल्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे. एका पॉडकास्टच्या छोट्या क्लिपवरून गैरसमज पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त करत, जान्हवीने तिला झालेल्या गंभीर त्वचाविकाराची माहिती दिली आहे. केवळ काही सेकंदांची रील पाहून अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांना तिने दोन भागांचा व्हिडीओ पोस्ट करत खडेबोल सुनावले आहेत.
या व्हिडीओमध्ये जान्हवीने आजवर कधीही समोर न आलेले आपल्या खराब त्वचेचे फोटो दाखवले आहेत. २०२० मध्ये पुण्याबाहेर एका मालिकेचे शूटिंग करत असताना महिन्याभरातच तिचा चेहरा पिंपल्सने भरला होता. डॉक्टरांनी तिला पाणी सूट होत नसल्याचे सांगितल्याने तिला ती मालिकाही सोडावी लागली होती. एक अभिनेत्री म्हणून चेहरा चांगला ठेवण्यासाठी ऐपत नसतानाही लाखो रुपये उपचारांवर खर्च करावे लागल्याचा खुलासा तिने केला आहे.
Janhavi Killekar Bisleri Controversy
बिस्लेरीच्या पाण्याच्या वापरावर संताप व्यक्त करत जान्हवी म्हणाली, ‘असा कितीला येतो तो पाण्याचा बाटला… 70 – 80 रुपयांमध्ये.. काय एवढं महाग आणि खर्चीक केलं मी?’ कोल्हापूरच्या पाण्याचा कोणताही दोष नसून तेथील पाणी चांगलेच आहे, मात्र आपली त्वचाच वाईट असल्याचे तिने मूळ व्हिडीओमध्येही स्पष्ट केले होते. पाणी बदलल्याचा त्रास केवळ सेलिब्रिटींनाच नाही, तर सर्वसामान्यांनाही होऊ शकतो, याकडे तिने लक्ष वेधले.
केवळ स्वतःचे लाईक्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी एका स्त्रीचा अपमान करणाऱ्यांवर जान्हवीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. महाराजांनी परक्या स्त्रीलाही आई-बहिणीसमान मानले, त्याच शिवभूमीत काही लोक केवळ व्ह्यूजसाठी एखाद्या स्त्रीला घालूनपाडून बोलत असल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ललित प्रभाकरला ‘कसाब’च्या भूमिकेत पाहून प्राजक्ता माळीची खास पोस्ट; म्हणाली, ‘मला तू आदित्यपेक्षा…’
- महिलेची अश्लील बदनामी; आमदार विलास भुमरेंचे निकटवर्तीय भाऊसाहेब तरमळेला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी
- दस्त नोंदणीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य; फसवणूक टाळण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा सर्वात मोठा निर्णय!
Quick Answers
कोल्हापूर दौऱ्यादरम्यान तिने बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याच्या वक्तव्यावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे हा वाद निर्माण झाला होता.
२०२० मध्ये पुण्याबाहेर एका मालिकेचे शूटिंग करत असताना महिन्याभरातच तिचा चेहरा पिंपल्सने भरला होता.
पाण्याचा बाटल्यांचा खर्च फारसा जास्त नसून कोल्हापूरच्या पाण्याचा दोष नाही, तर आपली त्वचाच वाईट असल्याचे तिने स्पष्ट केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









