Share

LPG Price Hike: सणासुदीत महागाईचा भडका! LPG सिलेंडरचे दर वाढले, तुमच्या शहरांतले दर काय?

ऐन सणासुदीत ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर ६२.५० रुपयांनी वाढवले आहेत, मात्र घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत.

Published On: 

LPG Price Hike 19kg commercial gas cylinder price increased in India

नवा महिना, नवा दिवस आणि खिशाला महागाईची नवी झळ… ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच एका मोठ्या झटक्याने झाली आहे. ऐन नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या तोंडावर हॉटेलमध्ये जेवण करणं किंवा बाहेरचे पदार्थ खाणं आता आणखी महाग होणार आहे. कारण, १ ऑक्टोबरच्या सकाळीच ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी महागाईची मोठी फोडणी दिली आहे.

१ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Price Hike) दरांमध्ये तब्बल ६२ रुपये ५० पैशांची मोठी वाढ करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच तेल कंपन्यांनी देशभरात हे नवे दर लागू केले आहेत. दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच, व्यावसायिक गॅसचे दर वाढल्याने कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांचे बजेट चांगलेच कोलमडणार आहे. दुसरीकडे, घरगुती गॅस वापरणाऱ्यांसाठी मात्र एक मोठा दिलासा आहे.

LPG Price Hike

त्यामुळेच, घरगुती १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. थोडक्यात सांगायचं तर, तुमचा घरातील गॅस जुन्याच दराने मिळणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरसाठी आता हॉटेलचालकांना २ हजार ८१० रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही या दरांमध्ये ९ रुपये ५० पैशांची वाढ झाली होती. आता सलग दुसऱ्या महिन्यात महागाईचा आलेख वर गेला आहे.

देशभरातील प्रमुख शहरांचा विचार केला तर, मुंबईत व्यावसायिक सिलेंडर २ हजार ७६४ रुपयांच्या घरात गेला आहे. तर कोलकात्यामध्ये २ हजार ९५४ रुपये आणि चेन्नईमध्ये २ हजार ९८३ रुपयांपर्यंत किमती पोहोचल्या आहेत. दुसरीकडे, घरगुती सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत. दिल्लीत घरगुती गॅस ९४२ रुपये, मुंबईत ९४१.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९५७.५० रुपयांना उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात गॅसची मागणी वाढलेली असते. त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला असला, तरी हॉटेलमधील जेवण महागल्यास अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लागणार, हे आता स्पष्ट झालंय.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

१ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये तब्बल ६२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही