प्रतिनिधी, 30 सप्टेंबर: अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी बजावलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिशीला अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी उत्तर दिले आहे. यापैकी दोघा कलाकारांची सुनावणी पूर्ण झाली असून, आता पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणातील सद्यस्थिती स्पष्ट केली. नोटिशीला उत्तर आले का, या प्रश्नावर ते म्हणाले, “त्या नोटिसांच्या संदर्भात तिघांकडूनही उत्तरे आली आहेत. त्यापैकी दोघांनी सुनावणीची विनंती केली होती. त्यांची सुनावणी काल पूर्ण झाली आहे. आता आम्ही पुढील कार्यवाही करू.”
महाराष्ट्र एफडीएने ११ ऑगस्टला या तीनही कलाकारांना नोटीस बजावून १५ दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी तातडीने ‘विमल इलायची’ची जाहिरात करणे बंद करावे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल कंटेंट हटवावा, असे आदेश या नोटिशीत देण्यात आले होते.
राज्यात पान मसाल्याची निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे. मात्र, २०२४ मध्ये हे तीनही कलाकार पान मसाला कंपनीच्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत एकत्र दिसले होते. ही जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करू शकते आणि बंदी असलेल्या उत्पादनाच्या ब्रँडला प्रोत्साहन देऊ शकते, असा ठपका एफडीएने ठेवला होता. तुकाराम मुंढे यांनी एफडीएची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यात भेसळयुक्त पदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार अन् कोयत्याने वार
- ‘खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकाच्या आरोपांना ओंकार भोजनेचं थेट उत्तर; म्हणाला, ‘ऐनवेळी नियोजन…’
- निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून मविआत मतभेद? राऊत, पवारांसह काँग्रेसची वेगळी भूमिका
Quick Answers
अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावली होती.
तिघांकडूनही नोटिशीला उत्तरे आली असून त्यापैकी दोघांची सुनावणी पूर्ण झाली आहे व आता पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









