Share

‘ज्ञानेश कुमार देशाचे दुश्मन नंबर एक, त्यांना उचलून फेकणार..’ सर्व संस्था मोदी-शाहांचे घरगडी’- संजय राऊत

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत, ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही ठाकरे बंधूंच्या पुढाकाराने आयोगाविरोधात ऐतिहासिक महामोर्चा काढणार असल्याची मोठी घोषणा केली.

Published On: 

Sanjay Raut criticising Election Commission and announcing October 4 protest

प्रतिनिधी, 27 सप्टेंबर: देशातील सर्व संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे ‘घरगडी’ झाले असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाही आणि संविधानाची हत्या करत आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीविरोधात येत्या ४ ऑक्टोबर रोजी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना राऊत म्हणाले की, मोदी आणि शाहांना जे हवे ते करण्यासाठी ज्ञानेश कुमार निर्णय देत आहेत. देशाचा ‘दुश्मन नंबर एक’ ठरलेले ज्ञानेश कुमार आता तीन आयुक्तांचे एकत्र बसलेले फोटो प्रसिद्ध करून सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर, सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीशही दबावाखाली आणि प्रलोभनाच्या छायेखाली असून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

या महामोर्चासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून, ४ ऑक्टोबरला स्वतंत्र मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्राची ताकद आणि संताप दाखवून देण्यावर एकमत झाले आहे. २४ तासांत मोठे आंदोलन उभे राहू शकत नाही, हजार-पाचशे लोकांच्या गर्दीने सरकारला फरक पडत नाही. लाखोंच्या संख्येने लोक जमवून सरकारला झुकवण्यासाठीच ४ तारखेपर्यंतचा वेळ घेतल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर २ ऑक्टोबर रोजी अभिजित दीपके यांच्या अराजकीय कार्यक्रमाला शिवसेनेचा पहिल्या दिवसापासून पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने ४ तारखेच्या मोर्चासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगाच्या प्रश्नांवर जनजागृती करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातही सर्वांनी एकत्र यावे अशी दोन्ही ठाकरे बंधूंची इच्छा असल्याचे राऊत म्हणाले.

काँग्रेसच्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्वतंत्र आंदोलनावर भाष्य करताना राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. इंडिया आघाडीमध्ये आपण सर्वजण असून राष्ट्रीय पातळीवर जर आम्ही राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे नेतृत्व मानत असू, तर महाराष्ट्रातही एकत्र चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी वेगळी भूमिका मांडून चालत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे, असे राऊत यांनी सुनावले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रवृत्तीविरोधात येत्या ४ ऑक्टोबर रोजी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही