मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका भव्य जनमोर्चाची हाक दिली आहे. राज ठाकरे यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाची शाखा असल्यासारखं काम करत ‘एसआयआर’च्या (SIR) नावाखाली मतदारांची घोर फसवणूक केल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर आणि कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवला होता.
देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने या जनमोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे संयुक्त आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या मोर्चाची निश्चित वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल. तसेच, इतर सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधून त्यांनाही या मोर्चात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदार यादीतून तब्बल १३ कोटी मतदारांची नावे कथितपणे वगळल्याचा आरोप करत, या प्रकरणाची विशेष तपास पथकाच्या (SIT) माध्यमातून चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार
- राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी विविध सवलतींचा शासन निर्णय जारी
- ‘विरोधकांना सुबुद्धी मिळो आणि कुबुद्धीचं विसर्जन होवो’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला
Quick Answers
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीला विरोध दर्शवण्यासाठी आणि देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जनमोर्चाची हाक दिली आहे.
निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाची शाखा असल्यासारखे काम करत 'एसआयआर'च्या (SIR) नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मतदार यादीतून १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









