Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटीत सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता आणखीच आक्रमक वळणावर पोहोचलं आहे. सलग आठव्या दिवशी उपोषणावर ठाम असलेल्या जरांगेंनी थेट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “शिंदेंनी पाप केलं असून, त्यांना गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा तळतळाट लागेल,” असा घणाघात करत जरांगेंनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे.
सरकार मराठा समाजाला केवळ वेड्यात काढत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “आम्ही चर्चेसाठी जातो, पण ते आमचं ऐकत नाहीत, असा केवळ दिखावा हे मंत्री करत आहेत,” असा संताप जरांगेंनी व्यक्त केला. फडणवीसांना इशारा देताना ते म्हणाले की, तुम्ही विमानात बसून निघून जाल, पण इथं दंगली घडतील. आम्हाला कुणाच्याही ताटातलं, म्हणजेच ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण नकोय, तर फक्त आमच्या हक्काचं द्या, अशी रोखठोक भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.
Manoj Jarange attacks Eknath Shinde over Maratha reservation
भाजपमध्येच एकमेकांना संपवण्याचा डाव; लाडकी बहीण योजनेवरही जरांगेंची सडकून टीका
दुसरीकडे, जरांगे पाटलांनी थेट भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही बोट ठेवलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपमध्ये सध्या सहा गट पडले असून तिथे एकमेकांना संपवण्याची स्पर्धा सुरू आहे. नुसत्या बैठका घ्यायच्या, मीडियासमोर झळकायचं आणि फडणवीसांकडून काहीतरी आदेश येतील, असा आभास निर्माण करायचा, हा मंत्र्यांचा लबाडपणा आता उघड झाल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. “लाडकी बहीण आता चप्पल घेऊन तयार आहे,” असा टोला लगावत त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अनुदान नाही आणि पीक विमादेखील मिळालेला नाही. शिंदेंनी ‘लाडकी बहीण’ आणली, म्हणून फडणवीसांनी ‘लाडकी दीदी’ योजना आणली, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
२०२३ पासून २०२६ पर्यंत सरकारकडे वेळ नाही, तर मग आतापर्यंत आम्हाला दिलं तरी काय? असा उद्विग्न सवाल जरांगेंनी उपस्थित केला आहे. मराठा समाज संयमी असला, तरी एकदा का तो पेटून उठला तर परिस्थिती गंभीर होईल, असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, आता राज्यभरात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मी एकनाथ शिंदेंना खूप मानते…’; गौतमी पाटीलचा जलवा, तर दुसरीकडे शिंदेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
- ‘झापूक झुपूक’ फेम सूरज चव्हाण बाबा झाला; ‘बिग बॉस’ विजेत्याच्या घरी जन्माष्टमीला चिमुकलीचं आगमन
- ‘कुणाच्या ताटातलं घेऊ नये, OBC ही शांत बसणार नाहीत’ मराठा आरक्षणावर गुलाबराव पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











