मनसेशी पंगा घेणं कृष्णराज महाडिकांना भोवलं; भाजप नेते रवींद्र चव्हाणांनी भर बैठकीत काढली खरडपट्टी

मनसेविरोधात आंदोलन करणारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी भर बैठकीत खडेबोल सुनावले आहेत.

Published On: 

BJP state president Ravindra Chavan slams BJYM Krishnaraj Mahadik over protest against MNS.

Ravindra Chavan: अमित ठाकरेंनी पुण्यातील एका महाविद्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला. याच रागातून भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी थेट राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर धडक मारण्याची योजना आखली.

पण हे आंदोलन फसतंय न फसतंय, तोच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी महाडिक यांचे चांगलेच कान टोचले आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून थेट मनसेला आव्हान देणाऱ्या भाजप युवा मोर्चावर आता स्वतःच्याच पक्षात नामुष्की ओढवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा रंगली आहे.

Ravindra Chavan on Krishnaraj Mahadik over MNS Protest

‘ते कालचं पोरगं काहीतरी बोलतं, तुम्ही आंदोलन का करता?’

मुंबईत पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली. भर व्यासपीठावरून त्यांनी महाडिकांना खडेबोल सुनावले. “तुम्ही आणि मी सर्वजण पाहतोय. ते कालचं पोरगं काहीतरी बोलतं, कोणीतरी ते ऐकतं आणि जाऊन फोटो काढतं. या गोष्टीवर आपण आंदोलन करायला नको होतं,” असं चव्हाण यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं.

कार्यकर्त्यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, “माझी युवा मोर्चाला हात जोडून विनंती आहे, अशी आंदोलनं करू नका. हे लोक काय करतायत, हे आधी समजून घ्या. त्यांची पद्धत चुकीची आहे. मला युवाशक्तीला कुठेही अडचणीत आणायचं नाही. आम्हाला युवकांना शिक्षित करायचंय, त्यांना गुंड म्हणून तयार करायचं नाही.” चव्हाणांच्या या रोखठोक भूमिकेमुळे महाडिकांवर दुहेरी नामुष्की ओढावल्याचं चित्र आहे.

सोमवारी अमित ठाकरे एका सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पाहणीसाठी गेले होते. तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला होता. ‘महापुरुषांच्या बाजूला हा फोटो कसा लावला?’ असा जाब अमित ठाकरेंनी विचारला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तो फोटो खाली उतरवला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना अटकही केली आहे.

याच मुद्द्यावरून भाजयुमो आक्रमक झाली होती. मंगळवारी महाडिक आपल्या कार्यकर्त्यांसह शिवतीर्थावर चालून गेले. पण मनसे कार्यकर्त्यांनी घराभोवती अशी काही अभेद्य तटबंदी केली होती की, भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. शेवटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महाडिकांना माहीममधून ताब्यात घेतलं. एकीकडे हे फसलेलं आंदोलन आणि दुसरीकडे चव्हाणांच्या कानपिचक्या, यामुळे भाजप-मनसे वादात आता नवा अंक सुरू झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही