Kangana Ranaut on Rahul Gandhi: तीन वर्षांच्या चिमुकल्या मुली जेव्हा बुरखा घालतात, तेव्हा राहुल गांधी शांत का असतात? असा सवाल करत खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने थेट काँग्रेसलाच टार्गेट केलंय. राहुल गांधींचा अजेंडा फक्त ‘सनातन’वर हल्ला करण्याचा असल्याचा गंभीर आरोप तिने केलाय.
अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या एका जाहिरातीवरून नुकताच मोठा वाद झाला होता. राहुल गांधींनी या वादात क्रितीची पाठराखण करणारी पोस्ट केली होती. याच पोस्टचा समाचार घेताना कंगनाने राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. क्रितीने आजवर कसे कपडे घातले, यावरून तिला कुणीही कधी बोललं नाही. पण माझी पोस्ट थेट रक्षाबंधनाबाबत होती, असं कंगना म्हणाली.
Kangana on Rahul Gandhi: बुरख्यावर मूग गिळून गप्प का?
राहुल गांधींच्या पोस्टमध्ये रक्षाबंधन हा शब्दच नव्हता. रक्षाबंधन हा धार्मिक विषय आहे आणि त्याचे काही नियम असतात, याची आठवण कंगनाने करून दिली. महिलांना हवे तसे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण सणांचे पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे.
याचवेळी तिने बुरख्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना कोंडीत पकडलं. तीन वर्षांच्या मुली बुरखा घालतात, तेव्हा त्यांना पितृसत्ताक पद्धती मोडण्याची आठवण का येत नाही? कारण त्या लहान मुलींना बुरखा म्हणजे काय हे माहीतही नसतं.
राहुल गांधी गोंधळलेले आहेत आणि त्यांची विचारसरणी मर्यादित असल्याचा टोलाही तिने लगावला. सनातनवर हल्ला करणं एवढाच त्यांचा अजेंडा आहे. त्यांना मी ‘हाफ ख्रिश्चन’ देखील म्हणणार नाही, असं विधान कंगनाने केलं.
जाहिरातीच्या वादावरही तिने स्पष्टीकरण दिलं. क्रितीच्या कपड्यांचा मुद्दा दुय्यम होता. पण त्या जाहिरातीत पूजा, गंध, अक्षता, फुलं किंवा साधं कुंकूही नव्हतं. हलवा पुरी आणि दिवा का दाखवला नाही? असा सवाल तिने केला.
टिळ्याशिवाय राखी कशी असू शकते? यातून थेट हिंदू संस्कृती पुसण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच केवळ मी नाही, तर संपूर्ण हिंदू समाज दुखावला गेला होता. कंपनीने जाहिरात मागे घेतली, हे अगदी योग्यच झालं, असंही कंगना ठामपणे म्हणाली.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने नवा वाद
- साखरेचा गोडवा कडू! DMart, Blinkit वर खरेदीला मोठी मर्यादा, ग्राहकांना फटका
- ‘माझी वेगळी जवानी तुम्ही पाहिली तरी कधी?’ रामदेव बाबांवर कंगना संतापली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











