Share

काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ पोस्टरमध्ये मोठी गल्लत; छत्रपती संभाजीनगरला दाखवला चक्क ‘शनिवारवाडा’!

महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केलेल्या ‘छात्रों की गूंज’ च्या नव्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली पुण्याचा शनिवारवाडा दाखवल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

Congress Chhatro Ki Gunj Poster Blunder showing Shaniwar Wada instead of Chhatrapati Sambhajinagar

Chhatro Ki Gunj: पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या यशानंतर काँग्रेसचा उत्साह वाढलाय हे नक्की. पण, हाच उत्साह आता सोशल मीडियावर चर्चेचा आणि काहीसा विनोदाचा विषय ठरतोय. कारण काँग्रेसने नुकतंच शेअर केलेलं एक भन्नाट पोस्टर!

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यानंतर, महाराष्ट्र काँग्रेसने ‘पुढची छात्रों की गूंज महाराष्ट्रात कुठे व्हायला हवी?’ असा सवाल करत एक ग्राफिक्स शेअर केलं. यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर असे चार पर्याय देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरच्या जागी पुण्याचा ‘शनिवारवाडा’!

तुम्ही म्हणाल यात विशेष काय? तर पोस्टर बारकाईने पाहिल्यावर खरी गोम लक्षात येते. चौथ्या क्रमांकावर असलेल्या ‘छत्रपती संभाजीनगर’च्या नावासमोर चक्क पुण्याच्या ऐतिहासिक ‘शनिवारवाड्याचा’ फोटो छापण्यात आला आहे!

छत्रपती संभाजीनगर हे ५२ दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं. इथं बीबी का मकबरा, देवगिरीचा किल्ला अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तरीही काँग्रेसकडून थेट पुण्याची वास्तू वापरली गेल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दुसरीकडे, नाशिकच्या नावासमोर वापरलेला फोटोही महाराष्ट्रातील नसून उत्तर प्रदेशातील काशीच्या (वाराणसी) घाटांसारखा दिसत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

थोडक्यात सांगायचं तर, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेत, भूगोलाचा आणि इतिहासाचा मात्र चांगलाच गोंधळ उडालेला दिसतोय. याबाबत अद्याप काँग्रेसच्या अधिकृत सूत्रांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मात्र, सोशल मीडियावर या भन्नाट चुकीची जोरदार खिल्ली उडवल्यानंतर अखेर काँग्रेसला आपली चूक लक्षात आली. त्यांनी तातडीने ते जुनं ट्विट डिलीट केलं आहे. तसेच, आता छत्रपती संभाजीनगरच्या नावासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (BAMU) गेटचा फोटो असलेलं नवं आणि दुरुस्त केलेलं पोस्टर त्यांनी शेअर केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही