Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याच्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या इशाऱ्यानंतर सरकारी हालचालींना वेग आला आहे. आज सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी ‘अंतरवाली सराटी’ येथे जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा पवित्रा त्यांनी कायम ठेवला आहे. ‘अंतरवाली सराटी’ येथे बेमुदत उपोषणाची तयारी सुरू असून, त्यानंतर मुंबईत आंदोलन करण्याबाबतही इशारा देण्यात आला आहे.
Manoj Jarange Maratha reservation protest
मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे चर्चेत सहभागी होणार असल्याचे समजते.
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा पवित्रा मनोज जरांगे-पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे, सरकारी शिष्टमंडळासोबतची आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या चर्चेतून काही तोडगा निघतो का, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मागील आंदोलनांच्या वेळी पावसामुळे झालेला चिखल, मंचाची जागा आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठीच्या सुविधा यांसारख्या बाबींचा विचार करून प्रशासन पूर्वतयारी करत आहे. आंदोलकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांचीही पाहणी करण्यात आली आहे.
अंतरवाली सराटी येथे आंदोलनाची तयारीही सुरू आहे. गोदावरी नदीकाठच्या १२३ गावांमधील समाजबांधवांसोबत बैठका घेऊन याचे नियोजन केले जात आहे. आंदोलकांसाठी अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक घरातून एका स्वयंसेवकाने यात सहभागी व्हावे आणि सकाळ-संध्याकाळी आंदोलनस्थळी ‘भाकरी’ पाठवाव्यात, अशा सूचना जरांगे-पाटील यांनी दिल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते’; असीम सरोदे यांचे मोठे विधान
- ‘अंडी फेकत असाल तर ईद येतेय लक्षात ठेवा’; गणेश मिरवणुकीवरून नितेश राणेंचा इशारा
- ‘मोदींनी चहा विकला याचा पुरावा आणा, राजकारण सोडतो’; संजय राऊतांचं थेट आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











