‘उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते’; असीम सरोदे यांचे मोठे विधान

असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा करत मोठे विधान केले आहे.

Published On: 

Asim Sarode on Shiv sena Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या मालकीहक्काबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. अलीकडील सुनावण्यांदरम्यान, ज्येष्ठ वकील कपिल सिबल (Kapil Sibal) यांनी शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गट यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांचा युक्तिवाद अद्याप ऐकणे बाकी आहे. या प्रकरणाबाबत ज्येष्ठ वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी आता एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

“शिवसेना प्रकरणाची सुनावणी वेगात सुरू आहे, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली आहे. कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असताना, त्यांना असत्यच आहे,’ अशी वागणूक देण्यात आली. असे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

Asim Sarode on Uddhav Thackeray

पुढे असीम सरोदे यांनी सांगितले की, “उद्धव ठाकरे यांची बाजू जणू काय असत्यच आहे, अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांना वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे मला ते अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात. उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ राजकीय पक्षातील नेत्यांच्या झुंडीनेच अन्याय केलेला नाही, तर राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी देखील त्यांच्यावर अन्याय केला आहे.”

“सुप्रीम कोर्टात देखील या प्रकरणाला प्रचंड विलंब झाला आहे, या अर्थाने हा सुद्धा अन्यायच आहे. त्यामुळेच मला उद्धव ठाकरे हे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण त्यांची बाजू बरोबर असून सुद्धा त्यांना इतक्या वर्ष कोणताही न्याय मिळालेला नाही आहे,” असे असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.

असीम सरोदे यांनी असे नमूद केले की, “एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती. शिवसेना पक्षाचे दोन गट पडले. एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. दरम्यान त्यामुळे शिवसेना पक्षाचे चिन्ह कोणाला द्यायचे, असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर होता.”

“विधीमंडळ पक्षाचे बळ बघताच निवडणूक आयोगाने शिवेसना पक्षाचे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिले, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. आता त्यावर सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडत आहेत.” असे स्पष्ट मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही