Share

भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातील 5 नेत्यांना मोठी संधी

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Published On: 

BJP National Executive Committee

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात (Central Cabinet) लवकरच मोठा फेरबदल होण्याची चर्चा असून, पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

भाजपने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठा फेरबदल जाहीर केला आहे. या पुनर्रचनेत महाराष्ट्रातील चार भाजप (BJP) नेत्यांना मोठ्या संधी आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

BJP National Executive Committee Announce 

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात ही नवी कार्यकारिणी काम करेल. आताच्या घोषणेनुसार माजी खासदार भारती पवार (Bharati Pawar) यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागलेली आहे.

मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्री पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे (Vinod Tawde) राष्ट्रीय महामंत्री व केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) कोषाध्यक्षपदी कायम असतील. प्रीती गांधी (Priti Gandhi) यांना सोशल मीडियासाठी सह-संयोजक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

स्मृती इराणी यांचे कमबॅक

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांचा समावेश असेल. दरम्यान, भाजप नेत्या स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून काम पाहतील.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर राजस्थानचे नेते सतीश पुनिया राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहतील. या बदलांमुळे नजीकच्या काळात पक्ष अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे. कार्यकारिणीमध्ये देशातील सर्व भागांतील प्रतिनिधींचा समावेश असावा, यासाठी भाजपने यावेळी विशेष प्रयत्न केले आहेत.

योगायोगाने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतानाच भाजपने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशीही चर्चा केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही