Share

‘मेलोनी समजून मिठी मारली नाही ना?’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा

राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्याने जॉर्जिया मेलोनी यांच्यावर केलेल्या वक्तव्याची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेत सन्मान राखण्याचा इशारा दिला आहे.

Published On: 

MEA spokesperson on Giorgia Meloni and Rahul Gandhi controversy

राजकारणात चेष्टामस्करी कधी अंगलट येईल, हे खरंच सांगता येत नाही. आता थेट इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावरून असाच एक मोठा राजकीय वाद पेटलाय. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी मेलोनी यांच्यावरून एक मिश्किल पण वादग्रस्त टिप्पणी केली होती. आता यावरून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक जीवनात एकमेकांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे असल्याचा कडक संदेश मंत्रालयाने दिलाय.

‘मेलोनी समजून मिठी मारली नाही ना?’; Giorgia Meloni वरून रंगला वाद

एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली. ‘फक्त नेत्यांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे’, असा टोला त्यांनी लगावला. हेच समजावून सांगण्यासाठी राहुल यांनी बाजूला उभ्या असलेल्या संदीप दीक्षित यांना अचानक मिठी मारली.

त्याचवेळी दीक्षित यांनी मिश्किलपणे विचारलं, “एक गोष्ट विचारू? मेलोनी समजून तर मिठी मारली नाही ना?” यावर राहुल यांनीही हसत, “मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही”, असं उत्तर दिलं. हाच संवाद आता वादाचं मोठं कारण ठरलाय.

थोडक्यात सांगायचं तर, या वक्तव्याची परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गंभीर दखल घेतली. भारत आणि इटलीचे संबंध अलिकडच्या काळात खूप मजबूत झाले आहेत. त्यामुळे राजनैतिक पातळीवर सार्वजनिक जीवनात एकमेकांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, या मुद्द्यावरून आता भाजपनेही राहुल गांधी आणि दीक्षित यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही