Share

Rahul Gandhi vs BJP: अमित शहांवरील ‘ती’ टीका भोवणार? राहुल गांधींना लोकसभेकडून डेडलाईन

अमित शहांवरील असंसदीय टीकेप्रकरणी राहुल गांधींविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल झाली असून, त्यांना २८ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत.

Published On: 

Rahul Gandhi gets notice from Lok Sabha over Amit Shah remarks

Rahul Gandhi vs BJP: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आता या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना मोठा दणका दिलाय. त्यांना २८ ऑगस्टपर्यंत खुलासा करण्याची कडक नोटीस बजावण्यात आली आहे.

भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि लोकसभेतील मुख्य प्रतोद संजय जयस्वाल चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. शहांबद्दल राहुल गांधींनी संसदेत वापरलेली भाषा असंसदीय होती, असा मोठा आरोप जयस्वाल यांनी केलाय.

दुसरीकडे, अनुराग ठाकूर यांनीही गंभीर आरोप केलेत. पूर्वकल्पना न देताच राहुल यांनी शहांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. यामुळे थेट सभागृहाचा अवमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

थोडक्यात सांगायचं तर, लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार समितीने या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. २९ आणि ३० जुलैच्या या तक्रारी आहेत. त्यावर आता राहुल गांधींना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपलं उत्तर द्यावं लागणार आहे. स्वतः संजय जयस्वाल यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी लोकसभा अध्यक्षांचे आभार मानलेत. सभागृहाची गरिमा राखण्यासाठी समिती योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, राहुल गांधींचे ते वादग्रस्त शब्द कामकाजातून आधीच वगळण्यात आले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही