Share

राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार नाही; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अमित शाहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता फार कमी आहे, असा मोठा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केलाय.

Published On: 

Rohit Pawar comments on Mahayuti Finance Ministry and Sunetra Pawar

Rohit Pawar: महायुती सरकारमध्ये सगळं काही अलबेल आहे का? कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात सुनेत्रा पवारांना भेट नाकारली, असा मोठा गौप्यस्फोट खुद्द रोहित पवारांनी केलाय. यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता धूसर झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीतील अंतर्गत घडामोडींवरून थेट भाजपवर निशाणा साधलाय. अजित पवार गटाची ताकद कमी करण्यासाठीच भाजपकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळेच राज्याच्या अर्थखात्याच्या नाड्या दादांच्या पक्षाकडे देण्यास भाजप आणि मुख्यमंत्री फारसे उत्सुक नाहीत, असं परखड मत रोहित पवारांनी मांडलं.

अर्थखात्यावर खऱ्या अर्थाने अजित दादांच्या पक्षाचा हक्क आहे. पण ते मिळवण्यासाठी आता त्यांना सरकारमध्ये भांडावं लागेल आणि आपली ताकद दाखवावी लागेल, असा टोला रोहित पवारांनी लगावला. दुसरीकडे, काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरही त्यांनी रोखठोक भाष्य केलं. विरोधक बोलत असतात, पण तुमच्याकडे राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आहे, धाडसी निर्णय घेऊन तुम्ही ते सिद्ध करून दाखवायला हवं, असं ते म्हणाले. तसेच, पत्रकार परिषदांमध्ये पक्षातील इतर नेतेच अध्यक्ष असल्यासारखे वागतात आणि पत्रकारांचा आवाज दाबतात, हे योग्य नसल्याचंही त्यांनी सुनावले.

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरही रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. शरद पवार गटाचे सर्व आठ खासदार संसदेत या विधेयकाच्या विरोधातच मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने २०१६ पासूनच यासाठी तयारी सुरू केली असून, वॉर्डांप्रमाणे जर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ फोडले गेले, तर देशात लोकशाही टिकणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, रोहित पवारांच्या या दाव्यांवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार पलटवार केलाय. अमित शाह रोहित पवारांना विचारून भेटी देतात का? असा खोचक सवाल करत, अर्थखातं कोणाला द्यायचं हा पूर्णपणे सरकारचा विषय असल्याचं दरेकर म्हणाले. रोहित पवार फक्त मीडियात चर्चेत राहण्यासाठी भविष्यवेत्ते बनत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही