Share

‘वडिलांसारखाच तुझा गेम वाजवणार’; राष्ट्रवादीच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी

फरार आरोपीकडून आमदार झिशान सिद्दीकी यांना व्हॉइस नोटद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

Published On: 

Zeeshan Siddique receives death threat voice note

Zeeshan Siddique : माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर, त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार गुंड झिशान अख्तर याने ‘व्हॉइस नोट’ (Voice Note) द्वारे ही धमकी दिल्याचे वृत्त आहे. या धक्कादायक प्रकारानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

“तुझ्याविरोधात फतवा काढलाय”

मिळालेल्या माहितीनुसार, परदेशातून पाठवलेल्या या व्हॉइस नोटमध्ये गुंडाने अत्यंत आक्रमक आणि अंगावर काटा आणणारी धमकी दिली आहे. “तुझ्या वडिलांची हत्या मीच केली होती, आता तुझी पाळी आहे. तू माझ्या प्रत्येक कामात अडथळा आणत आहेस. तुला क्राइम ब्रांचकडे जेवढं पळायचं आहे तेवढं पळ, तुझ्याविरोधात फतवा काढला आहे,” असे व्हॉइस नोटमध्ये म्हटले आहे.

Zeeshan Siddique receives death threat voice note

झिशान सिद्दीकी यांना थेट धमकी देताना तो गुंड म्हणाला, “वडिलांची हत्या झाली तेव्हा नशिबाने तू वाचलास, पण यावेळी मी तुला सोडणार नाही.” बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान अख्तर हा मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डनुसार ‘वॉन्टेड’ (फरार) आहे आणि तो परदेशातून आपली टोळी चालवत असल्याचे मानले जाते. या व्हॉइस नोटनंतर झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली असून, त्या व्हॉइस नोटचे ‘डिजिटल फॉरेन्सिक’ विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे (पूर्व) येथील त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. बाबा सिद्दीकी यांचे बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध आणि संघटित गुन्हेगारीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या कारणांमुळे ही हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी २७ जणांविरुद्ध ‘मोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही