Share

रिलायन्स जिओचा बाजारात मोठा धमाका, रिचार्जवर मिळणार 20 GB पर्यंत फ्री डेटा; कोणते आहेत प्लॅन्स?

रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी २० जीबीपर्यंत मोफत अतिरिक्त डेटा देणारे ४ नवीन प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणले आहेत, ज्यात अनेक सबस्क्रिप्शन मोफत आहेत.

Published On: 

Jio Free Data Plans offering extra data and premium subscriptions

🕒 1 min read

मुंबई – तुम्ही दरमहा रिचार्जवर हजारो रुपये खर्च करता, पण तुम्हाला माहिती आहे का की जिओ सध्या आपल्या ग्राहकांना तब्बल २० जीबीपर्यंत डेटा पूर्णपणे मोफत देत आहे? टेलिकॉम विश्वात स्पर्धा वाढल्याने कंपन्यांनी आता युजर्सना आकर्षित करण्यासाठी ऑफर्सचा पाऊस पाडला आहे.

रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी चार नवीन दमदार प्लॅन्स बाजारात आणले आहेत. यामध्ये ग्राहकांना नेहमीच्या डेटासोबतच अतिरिक्त हाय-स्पीड डेटा आणि महागड्या सबस्क्रिप्शनचे मोठे फायदे अगदी मोफत मिळत आहेत.

Jio Free Data Plans: जिओचे ४ धमाकेदार प्रीपेड प्लॅन्स

या यादीत पहिला प्लॅन ४५९ रुपयांचा आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा आणि सोबत ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुगल जेमिनी प्रो (Jio Gemini Pro Access) आणि जिओ हॉटस्टारचा ॲक्सेस मोफत दिला जात आहे.

दुसरीकडे, ग्राहकांसाठी ४९५ रुपयांचा आणखी एक पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. या २८ दिवसांच्या प्लॅनमध्ये रोज १.५ जीबी डेटा आणि ५ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. फॅनकोड आणि जिओगेम्स क्लाउडच्या सबस्क्रिप्शनमुळे खेळ आणि गेमिंगची आवड असणाऱ्यांची चांगलीच चंगळ होणार आहे.

अधिक वैधतेचा विचार करणाऱ्यांसाठी ७४९ रुपयांचा प्लॅन अगदी उत्तम ठरू शकतो. कंपनी या प्लॅनमध्ये ७२ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा आणि तब्बल २० जीबी अतिरिक्त हाय-स्पीड डेटा देत आहे. यामध्ये ५० जीबी मोफत क्लाउड स्टोरेज देखील उपलब्ध आहे.

सर्वात मोठा फायदा ८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतोय, ज्याचा दैनंदिन खर्च फक्त ९.९९ रुपये येतो. यामध्ये ९० दिवसांच्या वैधतेसह रोज २ जीबी डेटा आणि २० जीबी अतिरिक्त डेटा युजर्सना मिळेल. तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार आणि गुगल जेमिनी प्रोचे फायदे पाहता हा प्लॅन सध्या धुमाकूळ घालत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही