Share

लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात जूनचे पैसे कधी येणार? एक मोठी अपडेट समोर

लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली असून, १७ जुलैपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana scheme update and installment dates in Maharashtra

🕒 1 min read

मुंबई – राज्यातील लाखो महिला ज्या पैशांची महिनाभरापासून वाट पाहत आहेत, ते १५०० रुपये अखेर कधी जमा होणार? या प्रश्नाचे उत्तर आता समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबत मंत्रालयातून एक मोठी माहिती समोर येत आहे. जुलै महिन्याचे सुरुवातीचे दिवस उलटून गेले तरी अजूनही जूनचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

Ladki Bahin Yojana Payment Date: या तारखेला जमा होणार पैसे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून या निधीच्या वितरणाची अंतर्गत तयारी सुरू झाली आहे. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास येत्या १७ जुलैपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात. सरकारने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी ही एक संभाव्य तारीख मानली जात आहे. महिलांना याआधी मे महिन्याचे पैसे १५ जूननंतर मिळाले होते, तर मार्च आणि एप्रिलचे एकत्र ३००० रुपये मे महिन्यात खात्यात आले होते.

दुसरीकडे, या योजनेच्या लाभार्थी यादीतून तब्बल ८० लाख महिलांची नावे हटवण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सध्या राज्यात सुमारे १ कोटी ७० लाख महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. मात्र, ई-केवायसी न करणे, कागदपत्रांमधील त्रुटी आणि योजनेच्या कडक निकषांमध्ये न बसल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला यादीतून अपात्र ठरल्या आहेत.

त्यामुळेच आता अर्ज बाद झालेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही