Share

साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतलं शेकडो लिटर दूध; तुकाराम मुंढेंचा धसका की नेमकं घडलंय काय?

साताऱ्यात एका शेतकऱ्याने शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या भीतीने दूध नष्ट केल्याची चर्चा.

Published On: 

Satara farmer poured hundreds of liters of milk on road viral video Tukaram Mundhe FDA action fear

🕒 1 min read

एकाच वेळी शेकडो लिटर दूध रस्त्यावर पाण्यासारखं ओतून दिलं जातं, तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असते, नाही का? साताऱ्यात सध्या असाच एक व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरतोय, ज्याने थेट प्रशासनाचंही लक्ष वेधून घेतलं आहे.

माण तालुक्यातील मोही गावात एका शेतकऱ्याने कॅन भरून आणलेलं दूध चक्क रस्त्यावर ओतून दिलं. हा प्रकार घडताच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे, कडक शिस्तीचे अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कारवाईची. त्यांच्या धास्तीनेच हे भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं, असा दावा व्हायरल व्हिडीओतून केला जात आहे.

Tukaram Mundhe FDA Action

सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. राज्यभरात दुधातील भेसळखोरांविरुद्ध अत्यंत कडक मोहीम राबवली जात आहे. त्यातच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचं नाव आल्याने अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

मोही गावातही प्रशासनाची अचानक धाड पडणार, अशी कुजबूज सुरू होती. याच भीतीने संबंधित शेतकऱ्याने पुरावा नष्ट करण्यासाठी दूध रस्त्यावर ओतून दिल्याची चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, संबंधित शेतकऱ्याने मात्र हे सर्व आरोप थेट फेटाळून लावले आहेत. “रस्त्यावर ओतलेलं दूध भेसळयुक्त नव्हतं. ते खराब झाल्यामुळेच मला नाईलाजाने ओतून द्यावं लागलं,” असा दावा या शेतकऱ्याने केला आहे. सूत्रांनुसार, या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही.

शेतकऱ्याने स्वतःचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी नागरिकांच्या मनात संभ्रम कायम आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात, शेकडो लिटर दूध अचानक खराब कसं होऊ शकतं? असा थेट सवाल नेटकरी विचारत आहेत. त्यामुळे हे दूध खरोखरच नासलं होतं की कारवाईच्या भीतीने ओतलं, याचं उत्तर चौकशीनंतरच समोर येऊ शकेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही